परंपरेला नवा ‘साज’

लग्नसराई सुरू झाली आणि नावीन्यपूर्ण; पण एथनिक ट्रेंडसोबत पारंपरिक दागिन्यांना मागणी वाढली. कॉन्ट्रास्ट ज्वेलरीचा प्रभाव असला तरीही पारंपरिक साज ट्रेंडसेटर झाला आहे.
contrast jewellery
contrast jewellerysakal

- पृथा वीर

लग्नसराई सुरू झाली आणि नावीन्यपूर्ण; पण एथनिक ट्रेंडसोबत पारंपरिक दागिन्यांना मागणी वाढली. कॉन्ट्रास्ट ज्वेलरीचा प्रभाव असला तरीही पारंपरिक साज ट्रेंडसेटर झाला आहे. लग्नासारख्या मंगल प्रसंगी दागिने म्हणजे फक्त फॅशन नाही, तर दागिने म्हणजे ‘भावना’ हा ट्रेंड म्हणून ज्वेलरीचे पारंपरिक प्रकारांना पसंती आहे.

दागिन्यांची घडण, नाजूक काम पाहूनच दागिन्यांवर जीव जडतो. परंपरा आणि गुंतवणूक या दोन्ही दृष्टिकोनातून सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. पिढ्यानपिढ्या दागिने बनवून देण्याची ही परंपरा आजही टिकून आहे. हे दागिने इन्स्टॉलमेंटवरही घेता येत असल्याने मोठमोठे ज्वेलरी ब्रँड योजना आणतात. साहजिकच याकडे महिला आकर्षित झाल्या आहेत. जेम्सही खरेदी करण्यावर भर आहे.

मोठमोठ्या ब्रँडच्या नावाजलेल्या डिझाइन्स वन ग्रँम गोल्डमध्येही मिळतात. मंगळसूत्र, नेकलेस, कानातले, पैंजण आणि बांगड्या यामध्ये खूप व्हरायटी आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने ‘बोरमाळ’, कोल्हापुरी ‘ठुशी’, ‘लक्ष्मीहार’, ‘टेंपल’ ज्वेलरी, ‘गहूमाळ’ पुन्हा परतली आहे. मीना वर्क, मॅट फिनिशिंग, कुंदनच्या ज्वेलरीवर भर आहे. यंदा ‘रेड कॉपर’ ज्वेलरी आर्टिफिशिअल ज्वेलरीमध्ये लोकप्रिय ठरली आहे, तर नोझ रिंग, नथ यामध्ये ब्लॅक मेटलचा प्रभाव आहे. प्रेसिंग रिंग, मोत्याची, ऑक्सिडाइज्ड नथ व पैंजण यांना सर्वाधिक मागणी दिसून येते.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबतच पारंपरिक वेशभूषेला पूरक ठरते आहे ती मोत्यांची ज्वेलरी. पैठणी किंवा कोणत्याही ट्रॅडिशनल ड्रेसवर मोत्यांचे दागिने उठून दिसतात. बदल म्हणून कलर्ड मोत्यांची ज्वेलरी उपलब्ध आहे. थोडे लालसर रंग असलेल्या मोत्यांचे लांब हार, मोती आणि स्टोन्सचे पदक इतके झक्कास दिसतात की, इतर कोणतीही ज्वेलरी नसली तरी चालते. या कलर्ड ज्वेलरीमध्ये लांब पदक असलेली, रेग्युलर, चिंचपेटी असे प्रकारही मिळतात. शुभ्र मोत्यांचा सेट चारशे ते पाचशे आणि कर्लड मोत्यांचा सेट एक हजार रूपयांच्या पुढेच आहे.

वेगवेगळ्या रंगाची क्रिस्टल ज्वेलरीसुद्धा पारंपरिक वेशभूषेस खुलवते. हिरवा, लाल, निळा, गुलाबी असे वेगवेगळ्या रंगाचे क्रिस्टल प्रकाशात अधिक चकाकतात. या क्रिस्टलची क्वालिटीही चांगली असल्याने या ज्वेलरीची रेंजसुद्धा हजारच्या पुढे आहे. गोल्डन पॉलिशचे दागिने सोन्याच्या दागिन्यांना उत्तम पर्याय. या ज्वेलरीवर गोल्डन पॉलिश इतके बेमालूम असते, की दागिने सोन्याप्रमाणेच भासतात. या ज्वेलरीमध्ये राणीहार, लक्ष्मीहार, बाजुबंद सारखे पारंपारिक दागिन्यांचे प्रकार खास आकर्षण आहेत.

जोडवे, ‘टो रींग’ दागिन्यांतला सुंदर अलंकार. परंपरेनुसार विवाहातला हा सुंदर दागिना आता मुली इतर वेळीसुद्धा आवडीने घालतात. सुंदर आकार, आकर्षक डिझाइन आणि मालिकांचा प्रभाव यामुळे जोडव्यांचा ट्रेंड ‘टो रिंग’ म्हणून परतला. त्यातच ऑनलाइन साइटवर सातत्याने मिळणाऱ्या नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे जोडव्यांची मागणी वाढली आहे. चांदीच्या जोडव्यांइतकेच ऑक्सिडाइज्ड जोडव्यांना पसंती मिळत आहे.

चांदी, सोने, कुंदन, हिरे, मोती, वेगवेगळ्या स्टोन्समध्ये जोडवी मिळतात. ऑनलाइन मार्केटमध्ये ‘टो रिंग’चे अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण कलेक्शन बघायला मिळते. अगदी १५० रूपयांपासून टो रिंग मिळतात. त्वचेला अनुकूल आणि पायाचे सौंदर्य खुलवणारी जोडवी भारतीय संस्कृतीस साजेशी खुण आहे. परंपरा, विश्वास, प्रेम आणि स्त्रीत्वाचा हा सुंदर दागिना नव्या पिढीलाही भुरळ घालतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com