पत्नीसोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या वादाने त्रस्त आहात?

तुमची पत्नी जर सतत राग करून वाद करत असेल तर...
Relationship Tips
Relationship TipsEsakal

नात्यात सतत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असेल तर ते नाते टिकवणे खूप अवघड जाते. कधी कधी वाद इतक्या टोकाला जातो की, बरेच कपल विभक्त होण्याचा निर्णय घेतात. वास्तविक स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त भावनिक असतात. मात्र ते कधीही दाखवून देत नाहीत. स्त्रिया छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग-राग करतात काहीवेळा भावूक होऊन रडू लागतात. अशावेळी स्त्रियांचा राग कमी करुन त्यांना खूश करणे खूप सोपे असते. कारण त्या तेवढ्याच हळव्या आणि प्रेमळ असतात. तुमची पत्नी जर सतत राग करून वाद करत असेल यामुळे तुम्ही त्रस्त आहात? आता तिची कशी समजूत काढायची याचा विचार करत असाल तर घाबरु नका आज तुम्हाला आम्ही चार टीप्स सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच नात सुधारण्यास मदत होईल.

पत्नीशी आरामात बोला

तुमच्या पत्नीशी कितीही वाद झाले तरी या काळात संभाषण पूर्णपणे संपवणे योग्य नाही. याच कारण दोघांमधील अंतर वाढू शकते परिणामी तुमच्याशी असलेले नाते हळूहळू संपुष्टात येऊ शकते. पती-पत्नीमधील सततच्या संभाषणामुळे भांडणे लवकर मिटतात आणि तुमची पत्नी कोणत्याही वादाला गांभीर्याने न घेता शांत राहते. यामुळे तुमचे नाते दृढ होण्यास मदत होते.

Relationship Tips
Relationship : नात्यात रिस्पेक्ट देणे का गरजेचे? जाणून घ्या कारण

छोटे छोट प्लॅन करायला विसरू नका

नात्यात कंटाळवाणा नको असेल तर नवीन काहीतरी करत रहा. अशावेळी सरप्राईजचा खूप फायदा होतो. तुम्ही तिला न सांगता काही गिफ्ट दिणे, डिनरला, किंवा लाॅग ड्राईव्हला घेऊन जाणे असे प्लॅन करा. असे केल्याने तुमची पत्नी भावूक तर होतेच शिवाय तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेमाचा वर्षाव करू लागते. स्त्रिया लहान-सहान गोष्टीत आनंदी होत असतात. थोड जर कौतुक आणि आदर केलात तर त्या खूश होतात.

Relationship Tips
Relationship Tips: नात्यात दुरावा येतोय, या 5 चुका तर करत नाही ना?

आत्मीयता देखील आवश्यक आहे

शारीरिक संबंधाचा अर्थ फक्त सेक्स असा नाही. पत्नी जेव्हा तुमच्यावर रागावते तेव्हा रोमँटिक वातावरण तयार करा. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत कुठेही जाता तेव्हा चालताना तिचा हात हातात धरा. टीव्ही पाहताना खांद्यावर हात ठेवून तिला तुमच्या जवळ घ्या. हे सर्व नॉन-सेक्सुअल टच त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून देतात. यामुळे नात्यात अधीक भावनिक गुंतवणूक निर्माण होईल.

विनोदी स्वभाव ठेवा

मुलांना मुलींना हसवायला आणि मजा करायला खूप आवडते. जेव्हा ती तुमच्याशी काही असभ्य बोलत असेल तेव्हा तुम्ही नेहमी तुमच्या पत्नीला विनोदाने हसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे तिला कधीही कंटाळा येणार नाही. अशा वातावरणामुळे दु:खातही तिला तुमच्या सोबत राहावेसे वाटेल. तुमची हसण्याची सवय तिला तुमच्या जवळ आणेल. तुम्हाला तिला सतत आनंदी पाहायचे आहे याची तिला जाणीव होते. त्यामुळे ती तुम्हाला सोडून जाण्याचा विचार कधीच करू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com