True Love : या हिवाळ्यात 'या' पाच राशींना मिळणार त्यांचं खरं प्रेम

या राशींच्या लोकांना या हिवाळ्याच त्याचं खरं प्रेम भेटण्याची शक्यता आहे.
True Love
True Love sakal

हिवाळा प्रेमाचा ऋतू म्हणून ओळखला जातो. प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी हिवाळा हा त्यांच्या आयुष्यात ऊब घेऊन येतो. त्यामुळे अनेकजण हिवाळ्यात प्रपोज करणे किंंवा लग्न करणे, शुभ मानतात.

ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा हिवाळा काही राशींच्या प्रेमींसाठी शुभ असणार आहे कारण या राशींच्या लोकांना या हिवाळ्याच त्याचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया त्या राशी कोणत्या? (True Love these Zodiac signs find love this winter season read story )

मेष राशी

मेष राशींच्या लोकांना त्यांचं खरं प्रेम भेटू शकते. त्यांच्या राशीत प्रवासाचा योग आहे. त्यामुळे त्यांना अनेक नवीन लोकांशी संवाद साधायला मिळणार. अशातच त्यांना खरं प्रेमही मिळू शकते.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा हिवाळा खूप खास असणार आहे. कारण ते त्याचं प्रेम शोधण्यात नशीबवान राहील. त्याचं खरं प्रेम त्यांच्यासमोर येताच त्यांना जाणीव होणार.

सिंह राशी

सिंह राशीचे लोक खूप आनंदी आहे की त्यांना त्याचं खरं प्रेम या हिवाळ्यात मिळणार असल्याने त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होणार आहे. प्रेम आणि काळजी करणारा पार्टनर मिळाल्याने त्यांचं स्वप्न पुर्ण होऊ शकते. या राशींच्या लोकांना अनपेक्षितपणे त्यांचं खरं प्रेम मिळणार.

True Love
Astrology : 'या' चार राशीचे लोक कधीच कुणाचे चांगले मित्र होऊ शकत नाही

तुळ राशी

तुळा राशीच्या लोकांना त्यांच्या हसऱ्या आणि दिलखूलास स्वभावाने खरं प्रेम सहज मिळू शकते. ते स्वत:च इतरांची काळजी घेतात की त्यांच्यावर सहज कुणीही प्रेम करू शकतं. त्यामुळे त्यांना त्यांचं प्रेम सहज मिळणार.

वृश्चिक राशी

जरी वृश्चिक राशीचे लोक त्याचं खरं प्रेम शोधण्यात इच्छा दाखवत नाही तरी सुद्धा या हिवाळ्यात त्यांना खरं प्रेम मिळणार. या राशीचे लोक कदाचित ते ओळखू शकणार नाही पण कालांतराने त्यांना हे त्याचं खरं प्रेम असल्याचं जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com