Falooda Flavour: चॉकलेट अन् गुलाबापासून बनवा चवदार फालुदा, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

Summer Falooda: यंदा उन्हाळ्यात चवदार फालुदांचा आस्वाद घेऊ शकता.
Falooda Flavour
Falooda FlavourDainik Gomantak

try these falooda flavour in summer

उन्हाळा सुरू झाला की, कुल्फी, आईस्क्रिम आणि फालूदा खाण्याची इच्छा होते. लहान मुले असोत की प्रौढ, सर्वांना उन्हाळ्यात फालुदा, कुल्फी आणि आईस्क्रीम खायला आवडते. दुकांनामध्ये देखील हे पदार्थ खाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.

बाजारात फालुदाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. फालुदा खायला रुचकर आणि भूक भागवतो. जर तुम्हाला सामान्य फालुदाच्या चवीव्यतिरिक्त काहीतरी वेगळे आणि चविष्ट खायचे असेल, तर पुढील प्रकार नक्की चाखू शकता.

  • कुल्फी फालुदा

उन्हाळ्यात कुल्फी खायला अनेक लोकांना आवडते. तुम्ही फालुदा कुल्फीचा आस्वाद घेऊ शकता. यामध्ये शेवया, कुल्फी आणि सुकामेवा टाकले जाते. हा फालुदा घरी सहज बनवू शकता.

  • सुकामेका फालुदा

सुकामेका फालुदा पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटू लागते. तुम्ही हा फालुदा कधीही करू शकता. यामध्ये काजू, मनुका, बदाम, पिस्ता, नारळ आणि आइस्क्रीमची चव चाखायला मिळते. हा स्वादिष्ट फालुदा क्रीमी फालुद्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स आणि रबडी घालून तयार केला जातो.

Falooda Flavour
Bread Cutlet Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट ब्रेड कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी
  • चॉकलेट फालुदा

फळं आणि आईस्क्रीम फालुदा व्यतिरिक्त चॉकलेट फालूदा देखील खूप चवदार लागतो. यामध्ये सब्जा बीया, सुकामेवा, चॉकलेट सिरप आणि शेवया यांच्या मदतीने तयार केलेला हा चॉकलेट फ्लेवर्ड फालुदा तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही घरी देखील बनवू शकता.

  • रोज फालुदा

फालुदाच्या सर्व फ्लेवर्समध्ये अनेक लोकांना गुलाबाची चव असलेला फालुदा आवडतो. गुलाब सरबत, गुलकंद, ड्रायफ्रुट्स आणि रबडी यांच्या चवीने मनं प्रसन्न होते. उन्हाळ्यात रोज फालुदा पिण्याची मज्जा वेगळी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com