Twinkle Khanna Beauty Tips : रात्रीच्या जेवणात केवळ हा एकच पदार्थ खाते ट्विंकल?; म्हणून आहे 47 व्या वर्षीही फिट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twinkle Khanna

Twinkle Khanna Beauty Tips : रात्रीच्या जेवणात केवळ हा एकच पदार्थ खाते ट्विंकल?; म्हणून आहे 47 व्या वर्षीही फिट!

ट्विंकल खन्ना देखील सोशल मीडियावर ऍक्टीव्ह राहणाऱ्या सेलिब्रिटींपैकी आहे. जी सतत तिच्या पोस्ट आणि व्हिडिओद्वारे तिची लाइफस्टाइल, डेस्टीनेशन ट्रीपचे फोटो शेअर करत असते. व्हिडीओ पाहून 47 व्या वर्षीही ती इतकी फिट कशी असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो.

खर तर फिटनेससाठी अनेक लोक जीवाचे रान करतात. पावभाजी, बर्गर, पिझ्झा अशा पदार्थांना तिलांजली देऊन डायट करतात. ट्विंकलची लाइफस्टाइलही अशीच काहीशी आहे. कारण, ती खास असे डायट करत नाही तर डायटलाच तिने लाइफस्टाइल बनवले आहे. ती काय खास टीप देते ते पाहुयात.

झाडे देतात उर्जा

माझे लहानपणापासून स्वप्न होते की, मला एक मूल, एक पेट आणि एक बागिचा माझ्या घराजवळ असावा. जेव्हाही माझी मुले आणि पेट्स त्रास देतात तेव्हा मी  झाडांमध्ये रमते. तुमच्याकडे बाग नसेल तर खिडक्या आणि बाल्कनीमध्ये रोपे लावा. ते लगेच तुमचा मूड उंचावतात, असे ट्विंकल म्हणते.

हेही वाचा: Work Place Bad Habbits: वर्क प्लेसवरील 'या' 5 वाईट सवयी करतील तुमचं वाटोळं! ना इंक्रिमेंट ना प्रमोशन..

नवे काहीतरी करा

ती पुढे म्हणाली की, लोकांनी सतत नवे काहीतरी शिकायला हवे असे मला वाटते.  काहीतरी नवीन शिकत राहा ट्विंकल म्हणाली की तिने खूप दिवसांनी लहानपणी गिटार शिकायला सुरुवात केली. तो म्हणाला, 'मी फारसा चांगला गायक नाही. पण मी माझ्या मुलासोबत गिटार वाजवायला शिकायला सुरुवात केली. कोणास ठाऊक एक दिवस मीही चांगली गायक होईन.

रात्रीचे जेवण एक ऑमलेट

फिटनेसबद्दल ट्विंकल खास सल्ला देते तो म्हणजे, तिने प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांच्याकडून एक सवय लावून घेतलीय, जी ती तेव्हापासून फॉलो करत आहे. त्याबद्दल ती सांगते की, मी ही सवय वहिदा रहमानजी यांच्याकडून शिकले आहे. रात्रीचे जेवण कमी खाल्ल्याने शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करण्याची गरज नसते. त्यामुळे. वहिदाजींप्रमाणे मी दररोज रात्रीच्या जेवणात फक्त ऑम्लेट खाते.

हेही वाचा: Yoga Mat : परफेक्ट योगा मॅट कसे निवडावे?

तणाव दूर करण्यासाठी टिप्स

ट्विंकल खन्नाने चाहत्यांना तणाव कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली की, 'जेव्हा वय वाढत आहे असे वाटायला लागते तेव्हा तेव्हा ब्रीदींग एक्सरसाइज करावा. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल आणि रिलॅक्सही व्हाल.

आनंदी रहा

तरूण दिसायचे असेल तर आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. मी स्वतःला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. जेव्हा केव्हा कंटाळा येईल तेव्हा आवडते गाणे म्हणा, गप्पा गोष्टी, जोक्स ऐकवा. मनाला प्रसन्न वाटेल असे काहीतरी करा.

सनस्क्रीन लावा

जन्मापासूनच माझ्या त्वचेवर काही डाग होते. त्यामूळे मी नेहमी सनस्क्रीन लावते. जेव्हा तिला उन्हात बाहेर जावे लागते तेव्हा ती नक्कीच सनस्क्रीन लावते.