Yoga Mat : परफेक्ट योगा मॅट कसे निवडावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga Mat

Yoga Mat : परफेक्ट योगा मॅट कसे निवडावे?

योग हे एक साधे माध्यम आहे जे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. नियमित योगाभ्यासामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो आणि मन एकाग्र होते. आपण घरी किंवा पार्क किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी योगा करू शकतो. परंतु यासाठी आपल्याला योगा मॅटची आवश्यकता आहे.

योगा मॅट ही एका विशिष्ट सामग्रीपासून बनलेली असते. जी योगासनादरम्यान येणा-या घामापासून आपले संरक्षण करते. परंतु अनेक वेळा योग्य माहिती नसल्यामुळे आपण चुकीच्या योगा मॅट खरेदी करतो. चला जाणून घेऊया योग मॅट खरेदी करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे…

योगा मॅट का गरजेची आहे.

जेव्हा तुम्ही इतरांसोबत योगासनांचा सराव करता तेव्हा तुमचे आसन म्हणजेच योगा मॅट खूप गरजेची ठरते. कारण तुमचे आसन ही तुमची जागा असते. योगा अथवा व्यायाम करताना येणारा घाम तुमच्या अंगावरून गळत असतो. अशा वेळी जर तुम्ही योगा मॅट शिवाय आसान केलं तर तुम्ही जमिनीवरून सटकण्याची शक्यता असते. शिवाय योगा अथवा मेडिटेशन करताना तुमच्या अंगात निर्माण होणारी उर्जा यामुळे वाया जात नाही. यासाठी योग्य रिसर्च करूनच योगा मॅट खरेदी करा.

योगा मॅट घेताना या गोष्टी आवर्जून पहा

मॅटची जाडी

तुमची योगा मॅट किती जाड आहे. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यासाठी लक्षात ठेवा मॅट जास्त जाड अथवा जास्त पातळ असता कामा नये. योगा मॅटची जाडी कमीत कमी 1.5 असावी.

बाहेर नेणे सोपे

आजकाल लोक जीममध्ये, पार्कमध्ये अथवा मोकळ्या जागी योगाभ्यास करतात. घरातून अशा ठिकाणी जाताना तुम्हाला तुमची योगा मॅट सोबत न्यावी लागते. त्यामुळे तुमची योगा मॅट अशी असावी जी सहज गुंडाळून तुम्ही कुठेही कॅरी करू शकता.