
Valentine Day ला या ठिकाणी अजिबात जाऊ नका? नाहीतर मनातल्या गोष्टी मनातच राहातील
Valentine Day : आज व्हॅलेंटाइन डे च्या पर्वावर अनेक लव्ह कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी फियारयचा प्लान करतात. खास ठिकाणी जात त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. प्रत्येक शरहात अशी काही ठरलेली ठिकाणंही असतात जेथे प्रेम जोडपी काय भेटण्याचा प्लान करत असतात. मात्र माहितीये काय व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी या काही ठिकाणांवर जाऊच नका. नाही तर तुमच्या मनातल्या भावना मनातच राहातील.
इतर दिवशी अनेक जोडपी एकांत मिळवण्यासाठी मरीन ड्राईव्हच्या कठड्यांचा आधार घेत असतात. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इथे नवख्यांसोबत दुसऱ्याही प्रेमी युगुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला शांतता हवी असेल तर या ठिकाणी कधीही जाऊ नका.

जुहू बीच हा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी जुहू बीचवर कायमच गर्दी दिसून येते. त्यातच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुहू बीचवर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जाणे टाळा. नाहीतर तुम्हाला तुमच्या पार्टनरला जे सांगायचं आहे ते तुम्हाला नीट सांगता येणार नाही.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटेंचे बंगले असलेल्या वांद्रे बँडस्टँडलाही अनेक जण पसंती देतात. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आपलं प्रेम व्यक्त करण्याची अनेकांच्या मनात इच्छा होऊ शकते. त्यामुळे इथेही जाण्याआधी विचार करा. सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्लॅन मात्र फ्लॉप ठरण्याची शक्यता आहे.
वांद्रा वरळी सी लिंकच्या सुरुवातीला असणारा वांद्रा रेक्लेमेशन रोडलाही प्रेमी युगुल पसंती देतात. इथेही मोठ्या प्रमाणात आपणी खासगी क्षण घालवतात. त्यामुळे व्हॅलेंटाईल डेसाठी इथेही गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथेही जाताना विचार करा. (Valentine Day)