Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी निळ्या रंगाच्या वस्तू ठेवणे मानले जाते अशुभ

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला निळ्या वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते.
Vastu Tips
Vastu TipsSakal

do not use blue things these parts of home

घरात सुख -शांती राहावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रात रंगांबद्दल देखील माहिती दिली आहे. असे काही रंग आहेत जे घराच्या विशिष्ट कोपऱ्यांपासून दूर ठेवले पाहिजे.

खास म्हणजे निळा रंग लावताना काळजी घ्यावी. घरातील सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी निळा रंग लावताना योग्य दिशा निवडणे गरजेचे आहे.

  • कपाट

ज्या कपाटात पैसे ठेवता त्याचा रंग निळा नसावा. निळा रंग हा द्रव मानला जातो. वास्तूनुसार नेहमी निळ्या रंगाच्या कपाटात पैसे ठेवल्याने खर्च जास्त वाढतो.

  • दक्षिण दिशा

दक्षिण दिशेसाठी फक्त निळा रंग हा पाण्याचा रंग मानला जाऊ शकतो, म्हणून तो उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. दक्षिण ही अग्नीची दिशा आहे. त्यामुळे या दिशेपासून निळा रंगाच्या वस्तू ठेवणे टाळावा. दक्षिण दिशेला निळा रंग घरगुती समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो.

Vastu Tips
Heat Stroke: उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा कराल बचाव, जाणून घ्या सविस्तर
  • स्वयंपाकघर

वास्तुनुसार निळा रंग विषाशी संबंधित मानला जातो. कारण विषाचा रंग देखील निळा आहे. भगवान शंकरांनी विष प्यायले होते यामुळे त्यांना नीलकंठ देखील म्हटले जाते. म्हणून स्वयंपाकघरात निळ्या रंगाचा वापर करणे टाळावा.

  • पूर्व दिशा

दक्षिण ही अग्नीची दिशा आहे आणि पूर्व ही सूर्याची दिशा असते. म्हणून ती निसर्गाने उष्ण मानली जाते. वास्तुशास्त्रात पूर्व दिशेलाही निळा रंग वापरणे असुभ मानले जाते. निळा रंग किंवा निळ्या रंगाच्या वस्तू वापरायच्या असतील तर ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. म्हणजेच घराच्या ज्या कोपऱ्यात उत्तर आणि पूर्व दोन्ही दिशा मिळतात, त्या घराच्या पूर्व दिशेची संपूर्ण भिंत निळ्या रंगात रंगवू नका.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com