Vastu Tips: कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्यास नकारात्मकता होईल दूर

Vastu Tips For Car: कारमध्ये काही खास गोष्टी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते.
Vastu Tips
Vastu Tips Sakal

Vastu Tips for car keep these things in car according to vastu tips

घराशी संबंधित वास्तू नियम जितके महत्त्वाचे असतात तितकेच वाहनाशी संबंधित वास्तू नियम महत्त्वाचे आहे. कारण शुभ आणि अशुभ शक्तींचा प्रभाव केवळ घरावरच नाही तर वाहनावरही होतो. वाहनात लोखंडी धातूचा वापर केला जातो. लोहाचा संबंध राहूशी आहे आणि राहू नकारात्मकतेला प्रोत्साहन देतो. यामुळे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तुमच्या कारमध्ये ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता कमी होते आणि वास्तू दोषांमुळे होणारे अपघातही टाळता येतात.

देवाचा फोटो किंवा मुर्ती

कारमध्ये देवाचा फोटो किंवा मुर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होते. पण कारमध्ये ज्या ठिकाणी देवाचा फोटो किंवा मुर्ती ठेवतो, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.

क्रिस्टल स्टोन

कारमध्ये क्रिस्टल स्टोनही ठेवता येतात. असे मानले जाते की क्रिस्टल दगडांमध्ये नकारात्मकता दूर ठेवण्याची प्रचंड शक्ती असते. त्यामुळे कारमध्ये क्रिस्टल स्टोन ठेवणे आवश्यक आहे. गुलाबी स्टोन कारमध्ये ठेवू शकता.

कासव

वास्तुनुसार कारमध्ये काळा कासव ठेवणे शुभ मानले जाते. कारण यामुळे कारवर येणारे संकट आणि नकारात्मकता दूर राहते.

Vastu Tips
Summer Pet Care: ‘मोती’, ‘टॉमी’ लाही होऊ शकतो उष्माघात, अशी घ्या पाळीव प्राण्याची काळजी

पाण्याची बाटली

कारमध्ये पाण्याची बाटली ठेवणे शुभ मानले जाते. पाणी म्हणजे लोहाचा स्वामी राहूचा अशुभ प्रभाव कमी करणारे जल तत्व आणि कारमध्ये जल तत्व असल्यामुळे लाभ मिळतो. शिवाय होणारे अपघात टळतात.

मोरपिस

वास्तुनुसार कारमध्ये मोरपिस ठेवणे शुभ मानले जाते. कारमध्ये मोरपिस ठेवल्याने गाडीत कोणतीही वाईट शक्ती राहिली तर ती नष्ट होते. याशिवाय कारमध्ये मोरपिस ठेवल्याने सकारात्मक उर्जा आकर्षित होते.

ड्रीमकॅचर

वास्तुनुसार कारमध्ये ड्रीमकॅचर लावणे शुभ मानले जाते. यामुळे कारमधील नकारात्मकता दूर होते. आजकाल बाजारात देखील ड्रीमकॅचर उपलब्ध आहेत

मीठ

वास्तुनुसार कारमध्ये एका छोट्या डब्बीमध्ये मीठ ठेवावे. यामुळे कारमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com