Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये तुमच्याकडून नकळत झालेल्या या चूका घर उध्वस्त करू शकतात!

गृहिणीने कधीही असं करू नये, त्यामुळे घरात ओढावेल संकट
Vastu Tips For Kitchen
Vastu Tips For Kitchenesakal

Vastu Tips For Kitchen : घरातील स्वयंपाकघर हे संपूर्ण कुटुंबाचे केंद्र असते. या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातील सर्वात दर्जेदार वेळ घालवतो. शेवटी माणूस एवढं कष्ट का करतो, की त्याला दोन वेळचं जेवण मिळत नाही. स्वयंपाकघरात काही प्रकारच्या चुका टाळाव्यात असे वास्तुचे नियम सांगतात.

किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आणि सदस्यांचे आरोग्य निगडीत आहे. किचन संदर्भात विविध गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील सर्व अशुभ प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात.

Vastu Tips For Kitchen
Kitchen Tips :  घरात पाल दिसताच करा असे काम, पाल कायमची जाईल घर सोडून!

घरातील पसारा

सर्वप्रथम तेथे तुटलेली भांडी, निरुपयोगी वस्तू किंवा कचरा साठलेला नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या वापराच्या नसलेल्या किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर काढाव्यात. एकतर निरुपयोगी विजेची उपकरणे दुरुस्त करून घेणे किंवा ते घरातून काढून टाकणे चांगले ठरेल. ही परिस्थिती मुलांच्या करिअरमध्ये अडथळा आणते.

Vastu Tips For Kitchen
Kitchen Hacks : घरात झालाय मुंग्याचा सुळसुळाट? हे उपाय करा मुंग्या स्वत:च घर सोडून जातील!

अंघोळीशिवाय किचनमध्ये जाऊ नका

घरातील स्त्रीला आंघोळीशिवाय स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नये. कारण असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्वच्छ अंघोळ करूनच मग किचनमधील कामांना हात लावा.

स्वयंपाकघर आणि बाथरूम

वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघर आणि बाथरूम कधीही समोरासमोर नसावे. असे असले तरी बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा किंवा स्वयंपाकघरासमोरील पडदा झाकून ठेवावा. याची काळजी घेतली नाही तर नक्कीच घरात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती घराच्या प्रमुखासाठी चांगली नाही.

Vastu Tips For Kitchen
Kitchen hacks : जेवणात मीठ जास्त झालंय?, मास्टर शेफने दिल्यात या खास टिप्स!

किचनची जागा

घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा समोर कधीही स्वयंपाकघर बनवू नका, या परिस्थितीमुळे घरातील लोकांमध्ये सामंजस्य आणि समन्वयाचा अभाव निर्माण होतो. जर तुमच्या एन गेटजवळ किचन असेल तर ते पडद्याने झाकून ठेवा.

Vastu Tips For Kitchen
Kitchen Astro Tips: किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का? काय आहेत त्यांचे नियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com