Vastu Tips: घरात 'या' शुभ गोष्टी ठेवल्यास जीवनात मिळेल यश अन् सुख-संपत्ती

Vastu Tips: वास्तूनुसार काही गोष्टी घरात ठेवल्यास आर्थिक समस्येतून मुक्त होऊ शकतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करू शकते.
Vastu Tips:
Vastu Tips: Sakal

vastu tips for money add these things home read list

अनेक वेळा आयुष्यात खूप कष्ट करूनही अनेक लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना निर्माण होतात. अशावेळी जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर वास्तुशास्त्रातील उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

वास्तूनुसार काही गोष्टी घरात ठेवल्यास आर्थिक समस्येतून मुक्त होऊ शकतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करू शकते. चला जाणून घेऊया घरात ठेवलेल्या कोणत्या वस्तू आर्थिक समस्या दूर करतात.

पिरॅमिड

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पिरॅमिड ठेवल्याने घरातील सदस्यांवर चांगला प्रभाव पडतो. यामुळे व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात यश मिळते. तसेच सकारात्मक उर्जाही वास करते.

भगवान गणेश

हिंदू धर्मात गणेशाची खास पूजा केली जाते. असे मानले जाते की त्याच्या कृपेने सर्व कार्यात यश प्राप्त होते. बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्यास सुख-समृद्धी येते आणि घरात सुख-शांती नांदते.

Vastu Tips:
Vastu Tips: बाल्कनीत झाडे ठेवताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

भगवान हनुमानाचा फोटो

राम भक्त हनुमान जी हे कलियुगातील जागृत देव मानले गेले आहेत. जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असेल, तर त्यासाठी घरामध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावावा आणि रोज मनोभावे पूजा करावी. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते असे मानले जाते.

भगवान कुबेरचा फोटो किंवा मुर्ती

कुबेर हा धनाचा देव मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान कुबेर यांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अशा वेळी कुबेरजींचे फोटो घरात लावावा. वास्तुशास्त्रानुसार भगवान कुबेर यांची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने व्यक्ती आर्थिक संकटातून मुक्त होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com