Vastu Tips : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' उपाय करा; पैशांचा पाऊस पडेल अन् सुखी व्हाल

अशा स्थितीत काय करावे यावर अनेकांनी वास्तुशास्त्रामार्फत उपाय सांगितले आहेत.
Vastu Tips
Vastu Tips
Summary

अशा स्थितीत काय करावे यावर अनेकांनी वास्तुशास्त्रामार्फत उपाय सांगितले आहेत.

Vastu Tips : प्रत्येक व्यक्तीची काही ना काही स्वप्न असतात. ही स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपले व आपल्या कुटुंबांचे जीवन सहजतेने जगता यावे प्रत्येकजण मेहनत करत असतो. मात्र, अनेकांना मेहनत करूनही कष्टाचे चांगले फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत काहींना अनेकवेळा आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. तुमचा वास्तू दोष हे या समस्येचे कारण असू शकते. अशा स्थितीत काय करावे यावर अनेकांनी वास्तुशास्त्रामार्फत उपाय सांगितले आहेत. ज्याच्या अवलंब केल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख आणि समृद्धी वाढते.

झोपण्यापूर्वीचे उपाय

प्रत्येक व्यक्ती अत्यंत काळजीपूर्वक आणि आवडीने घर बांधतो. तसेच बांधकाम झाले की ते घर विविध वस्तूंनी सजवतो. मात्र, या काळात तो अनेकदा वास्तूची काळजी घेत नाही. त्यामुळे घरात समस्या निर्माण होऊ लागतात. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी घरी काही उपाय करून या समस्या पूर्णपणे दूर केल्या जाऊ शकतात.

Vastu Tips
Vastu Tips : पितळेचे भांडे घरातील बंद खोलीत असणे अशुभ, येईल आर्थिक संकट

स्वयंपाकघरात पाण्याची बादली भरून ठेवा

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बादली भरून स्वयंपाकघरात ठेवा. असे केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते आणि पैशाची समस्याही दूर होते. यासोबतच घराची आर्थिक स्थितीही मजबूत होते.

पाण्याने भरलेली बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेल्या बादलीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा.

दारात नियमित दिवा लावा

घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. यासोबतच मुख्य दरवाजावरही दिवा लावावा. वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात नेहमी तिचा वास राहतो.

Vastu Tips
Vastu Tips : इतरांच्या 'या' 5 वैयक्तिक गोष्टी चुकूनही वापरू नका, अडचणीत येऊ शकाल..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com