Vastu Tips: ऑफिसच्या डेस्क वर या गोष्टी कधीही ठेवू नये; कामात येतील अडथळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips

Vastu Tips: ऑफिसच्या डेस्क वर या गोष्टी कधीही ठेवू नये; कामात येतील अडथळे

Office Work Tips: आपण अनेकदा आपल्या कामासाठी रात्रंदिवस मेहनत करतो पण तरीही अपेक्षित यश नाही मिळत. पगाराची वाढ, किंवा बढती यासाठीचे प्रयत्न अनेदका काहीच फळ देत नाही. याचे कारण वास्तु शास्त्र देखील असू शकते हा विचार तुम्ही केला आहे का?

वास्तुशास्त्रानुसार कामाच्या ठिकाणी अशा समस्या येण्याचे कारण म्हणजे आपल्या काही चुका, ज्या लवकरच सुधारण्याची गरज आहे.

नोकरीत बढती मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. पण कधी कधी त्यांच्या छोट्या-छोट्या चुकांमुळे जीवनात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. ज्याचा परिणाम म्हणजे मनासारखे यश मिळत नाही. पगारवाढ होत नाही, अर्थात त्यामुळे पैशांच्या समस्या सुरू राहतात.

ऑफिसमध्ये कोणत्या या गोष्टी करणे टाळले पाहिजे:-

डेस्कवरच जेवण करणे - ऑफिसच्या टेबलवर किंवा डेस्कवर जेवणे वास्तूशास्त्रा नुसार चुकीचे आहे. याने आपल्याला कामात लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.

पॉवर नॅप- आपण अनेकदा काम करता करता थोडे पाच मिनिट का होईना पण टेबलवर डोकं ठेवून पडून घेतो. वास्तुशास्त्रानुसार असे चुकीचे आहे. आपला थकवा दूर करण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या आवारात किंवा बागेत फेरफटका मारावा किंवा चहा कॉफी घ्यावी.

हेही वाचा: Vastu tips : पती-पत्नीतील संबध बिघडलेत; ही फुले काढतील अडचणीतून बाहेर

काटेरी झाडे - तुम्ही बघितलं असेलच की काही लोक ऑफिसच्या टेबलवर शोभेच्या वस्तू किंवा छोटीशी झाडं लावतात. आजूबाजूला अशा गोष्टी असणे चांगलेच आहे यामुळे अनेकदा थकवा वाटत नाही पण ते झाड काट्याचे नसावे. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही जेवल्यावर ताटात हात धुताय? भोगावे लागतील गंभीर परिणाम

ड्रॉवर मध्ये खर्चाची यादी - टेबलमध्ये ड्रॉवरची सोय जरी असेल तरी तिथे, लाईटबिल, जेवणाचे बिल किंवा खर्चाची यादी ठेवणे टाळावे, या गोष्टी आपल्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवणेही टाळावे.

ऑफिसचे टेबल कधीही अस्ताव्यस्त ठेवू नका. आपले सामान कधीही विखुरलेले ठेवू नका. तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा संपूर्ण करिअरवर परिणाम करू शकतो.