Vat Purnima 2024 : वट पौर्णिमेला मैत्रिणींच्या मेळ्यात घ्या हे स्पेशल उखाणे, पतीचे प्रेम अधिकच वाढेल

ग्रामीण भागात एखादी शिदोरी सोडताना, सत्यनारायण, गौरीच्या खेळातही उखाणे घेतले जातात
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 esakal
Updated on

Vat Purnima 2024 :

पती-पत्नीच्या प्रेमाची साक्ष देणारा वट पौर्णिमेचा सण अगदी तोंडावर आला आहे. वडाची पूजा करण्यासाठी लागणारे साहीत्य, दोरा यांची खरेदीही झाली असेल. राज्यातील वेगवेगळ्या भागात अनोख्या पद्धतीने वट सावित्रीचे व्रत केले जाते. वट पौर्णिमेवेळी पारंपरिक गाणीही गायली जातात. तसेच, उखाणे घेण्याची परंपराही आहे.

नव्याने लग्न झालेल्या अनेक मुलींचा इतर मैत्रिणींशी ओळख वाढण्याचा सण म्हणजे वट पौर्णिमा होय. ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच वडाची पूजा करत आहेत. ज्यांचे नुकतेच लग्न झालेलं आहे, अशा नववधुंची वट पौर्णिमा खास असते. त्यांच पती अन् कुटुंबियांकडून कोडकौतुक होतं. त्यांना उखाणे घेण्यासाठी हट्टही केला जातो.  

Vat Purnima 2024
व्यसनमुक्ती उखाणे स्पर्धेत शीतल तेंडोलकर विजेत्या

यमक जुळवणाऱ्या वाक्यांमध्ये शब्द गुंफून पतीचे नाव उच्चारले जाते. ग्रामीण भागात तर एखादी शिदोरी सोडताना, सत्यनारायण, गौरीच्या खेळातही उखाणे घेतले जातात. वडाची पूजा ज्या पतीसाठी केली जाते. त्याच्याच नावाचे हे काही खास उखाणे तुम्हीही चारचौघींमध्ये गेल्यानंतर घेऊ शकता.

- वट पौर्णिमेला मैत्रिणींच्या मेळ्यात घ्या हे

स्पेशल उखाणे, पतीचे प्रेम अधिकच वाढेल

- वडाची पूजा करून सुहासुनिंची ओटी मी भरली

... रावांसोबतच्या संसारात मी आनंदाने रमली

- पावसाळ्यातला वट पौर्णिमेचा सण आहे पहिला

... रावांसोबतचा संसार माझा साक्षात देवानेच नशिबात लिहीला

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : उपवासाला चालणारा; घराघरात आवडणारा साबुदाणा परदेशातून भारतात कसा आला?

- वर्षभरात सर्वात महत्त्वाची आहे वट पौर्णिमा

..... चे नाव घेऊन गाते वडाचा महिमा

- वडाला घातल्या मी फेऱ्या सात,

... ची आणि माझी देवानेच बांधली लग्नगाठ

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : त्रासही होणार नाही व उपवासही होईल, यासाठी १२ टिप्स

- सत्यवान-सावित्रीच्या प्रेमाचं

प्रतिक आहे वडाचं झाड,

.... च्या आणि माझ्या

प्रेमात होवो वाढ

- हळद-कुंकू असतं सौभाग्याचं लेण,

वडाची पूजा करून मागते एकच मागणं

सुखी ठेव देवा माझ्या ... ला

दुसरं काहीही नको मला

Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला करा मराठमोळा साज, 'या' प्रकारच्या साड्या नेसून करा पूजा, दिसाल एकदम झकास.!

- वडाच्या झाडाच्या सावलीत वाटतो गारवा

...चा आणि माझा सुखी संसार आनंदाने भरावा

- कोल्हापुरी साज शोभतो माझ्या गळ्यात

...रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात   

Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला घरासमोर काढा एकापेक्षा एक आकर्षक रांगोळ्या, तुमच्या अंगणाला येईल शोभा..!

- वडाच्या पुजेने आशिर्वाद मिळचो सौभाग्याचा

... रावांसारखा पती लाभला लाखमोलाचा

पंढरीत आहे विठ्ठलाची रखुमाई

... रावांचे नाव घेते, वाहून फुल देवा चरणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com