बाईकवर स्टंट करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

video girl stunted to show stunt on bike
video girl stunted to show stunt on bike

अनेक तरुणांना भरधाव वेगात दुचाकीवर चालवण्याची किंवा स्टंट करण्याची सवय असते. यात आता तरुणीदेखील मागे राहिलेल्या नाहीत. अनेक तरुणी पुरुषांच्या बरोबरीने असे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही वेळा हे स्टंट जीवावरदेखील बेततात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी विना मास्क आणि हेल्मेटशिवाय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि याचा फटका तिला चांगलाच बसला आहे. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला असून त्यांनी तिच्याविरोधात कारवाई केली आहे.

गुजरातमधील गौरव पथ येथील संजना उर्फ प्रिंसी प्रसाद नामक एक तरुणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवत होती. सोबतच ती स्टंटदेखील करताना दिसत होती. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली असून तिला अटक करण्यात आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

संजनाविरोधात आयपीसी कलम २७९,१८८ आणि कलम २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईक चालवतांना संजनाने मास्क आणि हेल्मेट घातलं नव्हतं. तसंच, ती स्टंट करत होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तिच्या या व्हिडीओला १९ हजार ५०० लाइक्स मिळाले आहेत. संजनाने यापूर्वीदेखील बाईकवर असे स्टंट करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यापूर्वी तिने रॉयल एनफिल्ड, केटीएम आरसी ३९०, ड्यूक यासारख्या बाईक्स चालवल्या आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com