जेवल्यानंतर कुटुंबाने तिथेच टाकला कचरा आणि मग काय झाले पाहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

littering on table

जेवल्यानंतर कुटुंबाने तिथेच टाकला कचरा आणि मग काय झाले पाहा...

मुंबई : रेडिटवर प्रसारित झालेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. एका कुटुंबाने restaurantमध्ये जेवल्यानंतर उरलेले अन्न आणि कचरा टेबलवर तसाच पसरून टाकला आहे. त्याचे हे छायाचित्र आहे. हे रेस्टॉरंट रियाद येथील असल्याचे सांगितले जात आहे. जेवल्यानंतर सगळा कचरा कचराकुंडीत टाकण्याचे सौजन्यही या कुटुंबाने दाखवले नाही.

हेही वाचा: 'ऑडी इंडिया'कडून नवीन 'ऑडी ए८ एल'साठी बुकिंग्जचा शुभारंभ

छायाचित्र प्रसारित करणाऱ्या यूजरने दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबातील ८ ते १० जण जेवण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये आले होते. ते निघून गेल्यानंतर एवढा कचरा टेबलवर होता की साफसफाई करण्यासाठी ३ कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. इतरत्र कुठेही कधीही अशाचप्रकारची अस्वच्छता दिसून येत नाही. म्हणून यूजरने हे छायाचित्र काढले आहे.

हेही वाचा: सध्यातरी वेगळा पक्ष काढणार नाही पण बिहारसाठी काम करत राहणार : प्रशांत किशोर यांचं स्पष्टीकरण

हे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर समाजमाध्यमकर्मींनी त्यावर टीप्पणी करण्यास सुरूवात केली आहे. आपला कचरा कचराकुंडीत टाकणे इतकेही कठीण नाही. काही अंतरावरच कचराकुंडी आहे. तिथे हा कचरा टाकता आला असते, अशी टीप्पणी करत समाजमाध्यमकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. त्यांना ५०० सौदी रियाल किंवा १३३ डॉलर दंड भरावा लागतो. दुसऱ्या वेळी तीच चूक केल्यास दुप्पट दंड भरावा लागतो. पुढे ही रक्कम वाढत जाते.

Web Title: Viral Photo On Social Media Family Leaves Food Garbage On Restaurant Table Viral Photo On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Restaurant
go to top