गेवराई : खरमास (Kharmas) संपताच महिनाभर ब्रेक लागलेल्या लग्नाचा (Wedding Ceremony) धुमधडाका एप्रिलच्या १४ तारखेपासून पुन्हा सुरु झाला आहे. जूनच्या आठ तारखेपर्यंत विवाह मुहूर्त (Vivah Muhurat 2025) असून, त्यानंतर लग्न थांबा झाल्यावर थेट पुन्हा नोव्हेंबरमध्ये 'शुभ मंगलम सावधान'चे सनई चौघडे वाजणार आहेत.