Vivah muhurat calendar 2026-27
esakal
Hindu wedding dates November to June : यंदा नोव्हेंबर ते जून या कालावधीत विवाह सोहळ्यांसाठी एकूण ८८ मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामध्ये नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान २७ आपत्कालीन सिंहस्थ मुहूर्त, तर जानेवारी ते जूनदरम्यान ६१ मुख्य मुहूर्तांचा समावेश (Wedding Muhurat 2026-27) आहे. मुहूर्तानुसार लग्नसराईला सुरुवात झाली असून, आगामी काळात विवाह सोहळ्यांची धामधूम वाढणार आहे. त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांकडून लग्नाची तारीख निश्चित करणे, मंगल कार्यालय पाहणे, कपड्यांची खरेदी आणि इतर नियोजनाला सुरुवात झाली आहे.