Weight Loss Tips | लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स | How to lose weight fast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Tips for Girls Before Marriage, how to lose weight fast, marriage tips for bride
Weight Loss Tips: लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स

Weight Loss Tips: लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स

Weight Loss Tips for Girls Before Marriage: लठ्ठपणाच्या समस्येनं आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत. खासकरून लग्नाच्या वयात आलेल्या मुलींना ही समस्या जास्त भेडसावते.लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी वजन कमी करावं, असं अनेक मुलींना वाटतं. अशा परिस्थितीत त्या जिम ट्रेनर आणि पोषणतज्ञांचा सल्ला घेतात. परंतु बऱ्याच वेळा वधूंना जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. कारण त्यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी अधिक तयारी करावी लागते. (How to lose weight fast)

अशा परिस्थितीत मुलींनी घरी राहून वजन कमी करणे चांगले. यासाठी त्यांना खास आहार पाळावा लागतो. लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसतसे नववधूंवर चांगले दिसण्याचे दडपण येते आणि स्त्रिया सर्व प्रयत्न करतात. तुम्हीसुद्धा तुमचं वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला खास प्लॅन सांगणार आहोत...

हेही वाचा: महिलांनो, Weight Loss करताय! 'ही' तीन डाएट्स करताना करा विचार

लग्नाच्या एक महिना आधी फॉलो करा हा डाएट प्लॅन-

1. सकाळी दोन ग्लास पाणी आणि 10 बदाम खा

2. नाश्त्यात एक वाटी ओट्स, दलिया, पोहे, उपमा किंवा सँडविच खा

3. सकाळी एक वाटी फळे आणि एक ग्लास ताक घ्या

4. दुपारच्या जेवणात कोशिंबीर आणि दोन रोट्या किंवा एक कप ब्राऊन राइस, भाज्या आणि कडधान्ये खा.

5. संध्याकाळी एक कप ग्रीन टी आणि मूठभर मोडाची कडधान्ये किंवा भाजलेले हरभरे खा.

6. रात्रीच्या जेवणात सूप किंवा सॅलड आणि दोन भाकरी, भाज्या खा

7. झोपताना एक कप मलाईरहीत दूध प्या.

हेही वाचा: Weight Loss Tips: डायटमध्ये समावेश करा 'या' हाय प्रोटीनचा

लग्नाच्या एक आठवडा आधी -

1. सकाळी दोन ग्लास पाणी आणि 10 बदाम

2. नाश्त्यासाठी एक टोस्टेड मल्टीग्रेन ब्रेड आणि एक ग्लास दूध

3. सकाळी फळे

4. दुपारच्या जेवणात कोशिंबीर आणि भाकरी किंवा अर्धा कप ब्राऊन राइस, भाज्या आणि डाळी

5. संध्याकाळी एक ग्लास फळांचा रस आणि मूठभर कोंब किंवा भाजलेले हरभरे

6. रात्रीच्या जेवणासाठी सूप किंवा सॅलड आणि कोंडा ब्रेड आणि भाज्या

7. झोपण्याच्या वेळेस एक कप मलईरहीत दूध

वरील डाएट प्लॅन फॉलो करणं सुरुवातीला थोडे कठीण असले तरी तुमचं वजन कमी करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल.

Web Title: Weight Loss Tips For Girls Before Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top