Weight Loss Tips: वेट लॉससाठी फार नाही फक्त किचनमधल्या या पाच गोष्टी उपयोगी! वजन झटक्यात होईल कमी

मच्या किचनमध्येच तुमच्या वेटलॉसचा उपाय दडलाय. वाचा सविस्तर
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal

Weight Loss Tips: प्रत्येकाला फिट आणि निरोगी शरीर हवं असतं. तुमचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढले असेल तर जडपणा येतो. त्यामुळे ज्यांचे वजन वाढले ते कायम वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय शोधत असता. वेगवेगळे डाएट फॉलो करत असतात. मात्र आता तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. तुमच्या किचनमध्येच तुमच्या वेटलॉसचा उपाय दडलाय. वाचा सविस्तर

सरसोचे तेल

तुमच्या किचनमधील सरसोचं तेल वेट लॉससाठी उपयोगी ठरेल. सरसोच्या तेलात इतर तेलांच्या तुलनेत कमी सॅच्येरेटेड फॅट्स असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणासाठी सरसोच्या तेलाचा वापर करा. यात आवश्यक फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तुमच्या कॅलरीज नियंत्रित ठेवतात.

हळद - हळदीत फॅट बर्निंग गुणधर्म असतात. हे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न करतात. हळद खराब कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवते.

लसूण - वेट लॉससाठी लहूण प्रभावी ठरते. लसूण मेंदूला पोट भरले असल्याच्या वाइब्स देतात. त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही. यात एलिसिन नावाचा एक गुणधर्म असतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवते. (Fat loss diet)

Weight Loss Tips
Weight Loss Diet: चमचमित पदार्थ खाऊनही कमी होतं वजन! वेट लॉस डाएटसाठी हे भारतीय पदार्थ बेस्ट

बटरमिल्क - बटरमिल्क म्हणजेच ताकात २.२ ग्रॅम फॅट असते. ताक वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. ताका आहारात नियमित घेतल्यास कमी कॅलरीत शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात.

मध - मधाचा वापर हा वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. यात महत्वाचे व्हिटॅमिन आणि खनिज तेल असतं जे तुमचे फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com