
पॉर्न व्हिडीओ पाहिल्यामुळे मेंदूवर होतात हे परिणाम
Effects of Watching Porn: अलीकडच्या काळात इंटरनेट (Internet) अनेक लोकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना लोकांसाठी खुला झाला आहे. इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्मवरून अनेक प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. या व्हि़डीओमध्ये पॉर्न व्हिडीओंची संख्याही प्रचंड आहे. जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या टॉप 10 साईट्समध्ये पॉर्न साईटचा समावेश आहे. पॉर्नशी (Porn) संबंधित अनेक साईट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये अतिशय अश्लील व्हि़डीओ पोस्ट केले जातात.
जगभरातील अनेक लोकांना पॉर्नचं व्यसन (Porn Addiction) लागल्याचं पाहायला मिळते. पॉर्नचा वाढता विळखा लक्षात घेऊन भारत सरकारने काही काळापूर्वी अशा अनेक पॉर्न साईट्सवर बंदी घातली होती तसेच अनेक कठोर नियमही केले होते. परंतू तरीही पॉर्नचा विळखा काही केल्या कमी झाला नाही. पॉर्न पाहिल्याने मेंदूवर काय परिणाम होतात हे आज आपण पाहणार आहोत. (What are the effects of watching porn videos on the brain?)
हेही वाचा: गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ पॉर्न साईटवर, तरुणाला बसला धक्का
1. पॉर्नचं व्यसन- काही लोकांना पॉर्नचं व्यसन असते. सातत्याने पॉर्न व्हिडीओ ते पाहत असतात. परंतू यामुळे आपला मेंदू सतत त्याच पद्धतीने विचार करू लागतो आणि मेंदूवरच नियंत्रण कमी होते.
2. उदासीनता- नियमित पॉर्न पाहिल्याने लोकांचा रस इतर गोष्टींतून उडू लागतो आणि हळूहळू त्यांना नैराश्य येतं. त्याचा परिणाम कामभावनेवर होतो. त्यामुळे अशा लोकांना विवाहोत्तर आयुष्यात अडचणी येतात.
3. पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर डोपामाइन हार्मोन्सही नावाची हार्मोन्स वाढतात. या न्यूरोट्रांसमीटमुळे तात्पुरती आनंदाची भावना मिळते परंतू त्यामुळे मानवी चेतनेशी संबंधित मेंदूच्या स्ट्रायटमचा भाग संकुचित होतो.
4. जर एखाद्या व्यक्ती खूप जास्त पॉर्न चित्रपट पाहत असेल तर हळूहळू तो निरुत्साही होऊ शकतो.
हेही वाचा: पॉर्न पाहण्याचे दुष्परिणाम माहितीये का?
5. एका रिपोर्टनुसार पॉर्न चित्रपटांमुळे तरुणांची एक पिढी तयार होत आहे ज्यांचे वैवाहिक जीवन चांगले नाही.
6 व्यसनाधिनता, आक्रमकता, विकृत लैंगिक विचार, नकारात्मकता इ. गुण वाढीस लागतात. नियमितपणे पॉर्न पाहण्याचा वाईट परिणाम नातेसंबंधावरही होतो.
7. नात्यातील असुरक्षितता वाढू लागते. पॉर्नसाईटवरील विकृत लैगिंक क्रियांचा परिणाम नात्यासंबंधावरही दिसून येतो.
8. अनेकदा पॉर्नमुळे लैंगिक सुखाची इच्छा अनावर झाल्यामुळे अनेकदा विकृत घटना किंवा गुन्हे घडतात.
Web Title: What Are The Effects Of Watching Porn Videos On The Brain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..