तृतीयपंथी सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात; जाणून घ्या रहस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transgenders

तृतीयपंथी सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात; जाणून घ्या रहस्य

तृतीयपंथी व्यक्ती म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलताना आपल्याला दिसतो. पण त्यांच्या आयुष्याबद्दल आपण कधी जास्त विचार केलाय का? त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला माहिती आहे का? एका संशोधनातून समोर आलंय की सामान्य व्यक्तींच्या आयुष्यापेक्षा तृतीयपंथी व्यक्ती जास्त दिवस जगतात. त्यांच्या या जगण्यामागे काय गुपिते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

काही दिवसांपूर्वी कोरियामध्ये एक शोध लावला होता, त्यानुसार तृतीयपंथी व्यक्ती सामान्य लोकांपेक्षा जास्त काळ जगतात असं सांगण्यात आलं होतं. साधारण त्यांच्या जीवनाबद्दल लोक जास्त विचार करत नाहीत पण उत्सुकतेचा प्रश्न आपल्यालाही पडला असेल की त्यांच्या आनंदी जगण्याचं गुपित नेमकं कशात दडलंय.

हेही वाचा: Digital Payment: पुढील पाच वर्ष राहील UPI ची चलती

संशोधनामध्ये कोरियात हजारो वर्षांपूर्वीपासून राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवनाशी निगडीत कागदपत्रांचा अभ्यास केला गेला. त्या अभ्यासातून असं समजलं की त्यांच्या जगण्यातला व्यवस्थितपणा हा त्यांच्या जास्त दिवसांच्या आनंदी आयुष्याचं गुपित आहे. त्या आभ्यासानुसार तृतीयपंथी हे सामान्य लोकांपेक्षा २० वर्षे अधिक काळ जगतात. वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पुरुषांचे हार्मोन्स हे त्यांच्या आयुष्याला कमी करतात असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: Jobs: भारताबाहेर नोकरीच्या शोधात आहात? कुवैतमध्ये सुरु होतेय भरती

प्रत्येक संस्कृतीमध्ये तृतीयपंथीयांना विशेष स्थान आहे. कोरियामध्ये जिथे शाही घराण्यातील महिला राहतात असे ठिकाणं संभाळण्याची जबाबदारी तृतीयपंथीयांवर सोपवली गेलेली असते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांचे अंडकोष लहानपणीच कापले तर त्यांचा विकास होत नाही आणि ते बालक पुर्ण पद्धतीने पुरुष बनत नाहीत. यासंदर्भात शोध करताना वैज्ञानिक डॉक्टर शियोल कू यांनी सांगितलं की, कोरियामध्ये राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या अभ्यासातून त्यांच्यामध्ये महिलांचे लक्षण आढळून आले आहेत, ज्यामध्ये त्यांना मिश्या येत नाहीत. त्यांची छाती महिलांसारखी असते आणि त्यांचा आवाज हा जड असतो. कोरियामध्ये ते शाही दरबारात काम करत असत. मुघलांच्या काळातही त्यांना राजाच्या दरबारापासून राणीदरबारापर्यंत काम दिलं जात असायचं.

कोरियामध्ये तृतीयपंथीयांचा जन्म हा सन १५५६ ते १९६१ च्या दरम्यान झाला होता. त्यामध्ये त्यांचं सरासरी आयुष्य हे ७० वर्षे इतकं होतं. त्यामधील तीन लोकं १०० पेक्षा अधिक वर्षे जगले असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. भारतामध्ये त्यांच्या वयाच्या बाबतीत कुठलीही माहिती उपलब्ध नसून २०११ पासून त्यांना जनगननेत सामील करुन घेतलं आहे, त्यानुसार त्यांची देशभरातील लोकसंख्या ही ५ लाखाच्या आसपास आहे.

कोरियामध्ये शाही घराण्यातील पुरुषांचं वय हे सरासरी ४५ वर्षे इतकं होतं आणि त्याच्या तुलनेत तृतीयपंथीयांचं सरासरी वय हे ५० पेक्षा जास्त असल्याचं आढळलं आहे. सर्व समाजात महिलांचं वय हे पुरुषांच्या वयापेक्षा जास्त असते. एका संशोधनानुसार हे पुरुषांमध्ये असलेल्या टेस्टेस्टोरॉन या हार्मोनमुळे त्याचं सरासरी वय कमी असल्याचं पाहायला मिळालं आहे.

तृतीयपंथीयांच्या जगण्यातील पद्धत ही त्यांच्या जास्त वयाचे रहस्य असू शकते असं मत ब्रिटेनमध्ये वयस्कर व्यक्तींवर संशोधन करणाऱ्या एका वैज्ञानिकाने व्यक्त केलं आहे.

Web Title: What Is Secret Behind Transgender Have Long Life Than Normal Human

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LifeTransgenders
go to top