मुले घरापासून दूर गेल्याने हतबल होतात पालक...या काही गोष्टी करतील आयुष्य सोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child parent

मुले घरापासून दूर गेल्याने हतबल होतात पालक...या काही गोष्टी करतील आयुष्य सोपे

मुंबई : आईवडिल बरीच वर्षे आपल्या मुलांचे संगोपन करतात; पण मुले मोठी झाल्यावर शिक्षण आणि नोकरीसाठी त्यांना बाहेरगावी जावे लागते. हा पालकांसाठी कठीण काळ असतो. अशावेळी मुलांसोबत संपर्क कसा ठेवावा हे पाहू या....

हेही वाचा: शिक्षणासाठी कामगारांची मुले चालली परदेशी

अशा परिस्थितीचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. तुमच्यासारखे अनेकजण आहेत. अशा पालकांशी संवाद साधा. तुम्हाला आयुष्यात काय काय करायचे आहे याची यादी बनवा. मुले बाहेरगावी गेल्यावर तुमच्याकडे बराच वेळ असेल. अशावेळी तुमच्या राहून गेलेल्या गोष्टी करा.

प्रत्येकवेळी मुलांनीच भेटायला यावं असा हट्ट धरू नका. कधीकधी तुम्हीसुद्धा त्यांना भेटायला जा. यामुळे तुम्हाला त्यांची ख्यालीखुशाली कळू शकेल. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा पालकांकडे बराच वेळ उरतो. अशावेळी पालक कंटाळतात. यावर उपाय म्हणून एखादी अर्धवेळ नोकरी करावी किंवा घरातल्या घरात छोटासा उद्योगधंदा सुरू करावा.

हेही वाचा: रेल्वे प्रवाशांची परवड; आरक्षित तिकीट असेल तर जाता येईल

अधूनमधून फोनद्वारेही मुलांच्या संपर्कात राहा. मुलांशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी योग्य नियोजन करा. असे केल्यास लांब राहूनही संबंध चांगले राहतील. मुलं तुम्हाला सतत भेटायला येऊ शकत नाहीत याचे दु:ख करून घेऊ नका. कारण ज्या कामात मुले अडकलेली असतात त्यासाठीच तुम्ही त्यांना मोठं केलेलं असतं. तुम्ही मुलांसोबत किती वेळ घालवता यापेक्षा मिळालेला वेळ कसा घालवता हे जास्त महत्त्वाचे आहे.

Web Title: What To Do If Your Children Move Out

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ParentsChildren
go to top