
थोडक्यात:
शिस्तबद्ध मुलं समाजात आदर्श ठरतात आणि यशस्वी होतात.
वेळेचे महत्त्व, नियमांचे पालन, आणि आत्मनियंत्रण याने शिस्त वाढते.
प्रेमाने समजावणे, प्रोत्साहन देणे आणि सहानुभूती शिकवणे महत्त्वाचे आहे.
Parents' behavior disciplines children: आपलं मूल शिस्तबद्ध असावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं कारण एक शिस्तबद्ध मुलंच ना केवळ भविष्यात यशस्वी ठरत पण समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून देखील राहतं.
मुलांना शिस्त शिकवणे सोपे काम नाही, परंतु पालकांच्या काही सवयी मुलांना चांगला माणूस बनवण्याबरोबरच शिस्त शिकवू शकतात. मुलांनी शिस्तबद्ध राहून चांगल्या गोष्टी शिकल्या तर वर्तमानाबरोबर त्यांचे भविष्यही सुरक्षित होईल.
नियमाची व्याप्ती आणि गरज
नियम मुलांना मर्यादेत राहायला शिकवतात. यासाठी पालकांनी घरी काही नियम बनवून ते स्वतः पाळावेत. जेव्हा मुले तुम्हाला नियमांचे पालन करताना पाहतील , तेव्हा तेही तुमच्याकडून तेच शिकतील.
वेळेचे महत्त्व
एका महिन्याचे महत्त्व बाळंतिणीला विचारा, एका आठवड्याचे महत्त्व पगार न झालेल्या नोकरीदाराला विचारा, एका दिवसाचे महत्त्व रोजंदारीवरील कामगाराला विचारा, एका तासाचे महत्त्व परीक्षेस उशिरा पोचणाऱ्या विद्यर्थ्याला विचारा, एका मिनिटाचे महत्त्व ऍम्ब्युलन्स चालकाला विचारा, आणि एका सेकंदाचे महत्त्व तुम्ही धावपटूला विचारा.
वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे फक्त पालकच मुलांना शिकवू शकतात. पालकांनी स्वतः त्यांची सर्व कामे वेळेवर करावीत. मुलांमध्ये अभ्यास, खेळणे, खाणे, विश्रांती यासारखी कामे वेळेवर करण्याची सवय लावा. त्यामुळे मुलांमध्ये वक्तशीरपणाची सवय लागते.
इंद्रिय संयमन आणि आत्मनियंत्रण
शिस्त म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे. मुलांना प्रत्येक वेळी हवे तसे करण्याची मुभा देऊ नका. जसे की त्यांनी एक तास अभ्यास करायचा आणि एक तास खेळायचा असे ठरवले असेल तर ठरलेल्या वेळेत ठरलेलं काम पूर्ण करण्यास प्रोत्साहित करा, त्यांच्या पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवा
सहानुभूती शिकवा
पालकांच्या कर्तव्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये करुणेची भावना विकसित करणे. त्यांना लोकांशी चांगले वागायला शिकवा. याच्या मदतीने मुलाला दयाळूपणा आणि दानशूरपणाची भावना देखील समजू शकेल.
मुलांना कृतज्ञ बनवा
पालकांनी आपल्या मुलांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावली पाहिजे. यातून मुले शिकतात की इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे.
प्रोत्साहन देणे
पालकांनी मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या छोट्या कामगिरीचे कौतुक करा जेणेकरून ते शिस्तीचे पालन करत राहतील. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि त्यांना शिस्तीचे महत्त्व कळते.
टीका करण्याऐवजी गोष्टी समजवा
प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी मुलांना टोमणे मारणे त्यांना शिस्त लावू शकत नाही. मुलांना शिव्या घालण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगा की चुका सुधारण्याचा मार्ग काय आहे. टीका मुलांना परावृत्त करू शकते. पण गोड़ भाषेत काढलेली समजूत त्यांना कायम लक्षात राहील.
शिस्त म्हणजे काय आणि ती मुलांसाठी का आवश्यक आहे?
(What is discipline and why is it important for children?)
शिस्त म्हणजे नियमांचे पालन आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सवय. ती मुलांना चांगले निर्णय घेण्यासाठी, जबाबदारीने वागण्यासाठी आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते.
पालकांनी मुलांमध्ये शिस्तीची सवय कशी लावावी?
(How can parents instill discipline in children?)
पालकांनी स्वतः नियम पाळून उदाहरण ठेवावे, वेळेचं महत्त्व शिकवावं, आत्मनियंत्रणाची सवय लावावी आणि प्रेमाने समजावून शिस्तीचा मूलभूत अर्थ स्पष्ट करावा.
मुलांना वेळेचे महत्त्व कसे शिकवायचे?
(How to teach children the value of time?)
दैनंदिन कामांना वेळ ठरवून त्या वेळेचं पालन करायला शिकवा. अभ्यास, खेळ, जेवण आणि झोप यासाठी ठराविक वेळ पाळल्याने मुलांना वक्तशीरपणा आणि वेळेचं महत्त्व समजतं.
मुलांच्या चुका सुधारताना टीका करण्याऐवजी काय करावे?
(What should be done instead of criticizing children for their mistakes?)
मुलांना शिव्या न घालता त्यांच्या चुका प्रेमाने समजावून द्या. त्यांना योग्य मार्ग दाखवा आणि चुका सुधारण्यास प्रेरणा द्या, जेणेकरून ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.