esakal | नोज पिअरसिंग केल्यावर घ्या 'ही' काळजी; होणार नाही इंफेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

नोज पिअरसिंग केल्यावर घ्या 'ही' काळजी; होणार नाही इंफेक्शन

नोज पिअरसिंग केल्यावर घ्या 'ही' काळजी; होणार नाही इंफेक्शन

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सौंदर्यात भर पाडण्यासाठी, वेगवेगळी आभूषणे परिधान करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून स्त्रिया कान, नाक टोचत आहेत. त्यामुळे देशातील अनेक स्त्रियांच्या नाकात आणि कानात वेगवेगळे अलंकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे एकेकाळी जणू कान व नाक टोचण्याची प्रथाच पडली होती. मात्र, एकेकाळच्या या प्रथेकडे आता फॅशन म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक तरुणी हौस म्हणून नोज किंवा इअर पिअरसिंग करुन घेतात. हो. पिअरसिंग. कालानुरुप टोचून घेण्याच्या या पद्धतीचं नाव बदललं आहे. आता त्याला नोज, इअर पिअरसिंग (Nose-Ear Piercing) असं म्हटलं जातं. परंतु, हे नोज पिअरसिंग करताना काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. (when-piercing-your-nose-and-ears-keep-these-things-in-mind)

अनेक ठिकाणी मुली लहान असतानाच त्यांचं नोज पिअरसिंग केलं जातं. मात्र, ज्या मुलींचं नोज पिअरसिंग नाहीये त्या तरुण वयात नाक टोचून घेतात. परंतु, नोज पिअरसिंग करताना अत्यंत त्रास होतो. अनेकदा हे पिअरसिंग केल्यावर त्याचे साईड इफेक्ट्सदेखील जाणवतात. म्हणूनच, नोज पिअरसिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे पाहुयात.

हेही वाचा: प्री मॅच्युअर बालकाच्या विकासाचं टेन्शन येतंय?

१. अनुभवी व्यक्तीकडेच जा -

ज्याप्रमाणे पिअरसिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याच पद्धतीने पिअरसिंग करुन देणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे आजकाल सहज कुठेही दारावर, रस्त्याच्या कडेला पिअरसिंग करुन देणारी माणसं पाहायला मिळतात. परंतु, नोज पिअरसिंग कधीही सोनाराकडे (गोल्डस्मिथ) किंवा त्यात कुशल असलेल्या व्यक्तीकडूनच करु घ्यावं.

२. धातूची योग्य निवड -

अनेकदा मुली फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या धातूच्या तारा वापरतात. परंतु, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अनेकदा नाकावर फोड येणे, त्यातून पू किंवा रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून, कधीही नाक टोचताना सोनं किंवा चांदीच्या तारेचाच वापर करावा. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही.

३. नोज रिंगची हालचाल -

पिअरसिंग केल्यानंतर काही काळ त्या भागात प्रचंड वेदना होतात. साधा धक्का जरी लागला तरीदेखील नाक ठणकू लागतं. मात्र, तरीसुद्धा पिअरसिंग केल्यानंतर नाकातील तार गोलाकार (क्लॉकवाइट किंवा अँटी क्लॉकवाइज) पद्धतीने फिरवत रहा. त्यामुळे पिअरसिंग केलेली जागा मोकळी होईल व कालांतराने तिथे होणाऱ्या वेदना कमी होतील. जर तुम्ही ही तार फिरवली नाहीत तर ती नाकात एकाच जागी घट्ट अडकून बसण्याची शक्यता निर्माण होते.

४. स्वच्छता महत्त्वाची -

पिअरसिंग केल्यानंतर नाक दुखतं म्हणून अनेक जणी त्या भागाची स्वच्छता करत नाहीत. परंतु, वेदना झाल्या तरीदेखील स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे. अनेकदा नाक स्वच्छ न केल्यामुळे त्या ठिकाणी धूलीकण जमा होऊ शकतात. ज्यामुळे इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

५. घरगुती उपायांची घ्या मदत -

नाक दुखत असेल तर पिअरसिंग केलेल्या ठिकाणी तेल आणि हळद यांचं मिश्रण एकत्र करु लावा. किंवा, साधं खोबऱ्याच्या तेलाचे २ थेंब नाकावर आणि नाकाच्या आत सोडा.

loading image