esakal | प्री मॅच्युअर बालकाच्या विकासाचं टेन्शन येतंय?; मग अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Born Baby

प्री मॅच्युअर बालकाच्या विकासाचं टेन्शन येतंय?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात अनेक लहान बालकांचा जन्म वेळेपूर्वी म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यात होतो. त्यामुळे वेळेपूर्वी जन्माला आलेल्या बालकांना ‘प्री-मॅच्युअर बेबी’ असं म्हटलं जातं.बऱ्याचदा या बाळांची पूर्ण वाढ झालेली नसते. त्यामुळे अन्य बालकांच्या तुलनेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे या मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. म्हणूनच, ‘प्री-मॅच्युअर’ मुलांची काळजी कशी घ्यावी हे आज पाहुयात. (lifestyle-family-growth-and-development-of-premature-babies)

प्रग्नंसीच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्माला आलेल्या बालकांना प्री-टर्म बेबी म्हटलं जातं. विशेष म्हणजे या बालकांना कोणतंही इंफेक्शन लगेच होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या प्री मॅच्युअर बेबीला अनेकदा बराच काळ रुग्णालयात ठेवण्यात येतं. या बाळांचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे पालकांना जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणूनच वयोगटानुसार या बाळांची काळजी कशी घ्यायची ते जाणून घेऊ.

हेही वाचा: महिलेला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग; देशातील पहिलाच रुग्ण

२ महिन्यांचं बाळ -

प्री- मॅच्युअर बाळ दोन महिन्यांचं झालं की हळूहळू हालचाल करु लागतं. शरीरावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता त्याच्याच विकसित होते. त्याचसोबत प्रतिसाद देणं, हसणे, व्यक्तींना ओळखणे अशा गोष्टी त्यांच्यात विकसित होऊ लागतात.

४ महिन्यांचं बाळ -

बाळ चार महिन्यांचं झालं की त्याच्या शारीरिक गतींना वेग येतो. हातपाय हलवणे, पालथं पडणे, वस्तूंना स्पर्श करणे अशा गोष्टी बाळ करु लागतं.

६ महिन्यांचं बाळ -

६ व्या महिन्यात बाळ बसायला शिकतं. तसंच रांगू लागतं. विशेष म्हणजे या काळात बाळ बोलण्याचा प्रयत्न करतं.

१ वर्षाचं बाळ -

१२ महिने पूर्ण झाल्यानंतर प्री मॅच्युअर बेबी हळूहळू चालू लागतं. आई किंवा अन्य कोणी संवाद साधला तर त्यांना प्रतिक्रिया देतं. आई दूर गेल्यावर त्याची जाणीव होऊ लागते.

अशी घ्या प्री मॅच्युअर बाळाची काळजी

१. प्री मॅच्युअर बाळाच्या शरीराचं तापमान कायम तपासणं गरजेचं आहे. बाळाच्या शरीराचं तापमान हे नॉर्मल असणं आवश्यक आहे. त्यामुळे बाळ झोपलेलं असताना त्याच्या अंगावर मोठ-मोठ्या चादरी किंवा ब्लॅकेट टाकू नका. मुलांच्या शरीराचं तापमान साधारणपणे 97.6 ते 99.1 फारेनहाइट टेंपरेचर असावं.

हेही वाचा: नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

२. बाळाच्या झोपेची विशेष काळजी घ्या. बाळाला झोप लागेल असं वातावरण घरात निर्माण करा. बाळाच्या खोलीत हलका प्रकाश येईल याची काळजी घ्या. तसंच बाळाला रात्री भूक लागली तर त्याला वेळेवर दूध पाजा. अनेकदा फूल टर्म बेबीपेक्षा प्री मॅच्युअर बेबीला जास्त दूध पाजावं लागू शकतं.

३. प्री मॅच्युअर बाळाला कायम कोमट पाण्यानेच अंघोळ घाला. तसंच बाळ एक महिन्याचं होईपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा लोशन लावू नका.

४. या बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे त्यांना वारंवार घराबाहेर फिरायला नेऊ नका. त्यामुळे इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image