White Hair Treatment: पांढरे केस मुळापासून काळे करायचे आहेत? मग किचनमधल्या या गोष्टी येतील कामी

how to black hair naturally: हेअर डाय किंवा हेअर कलर करून केस काळे करणं शक्य असलं तरी हा काही दिवसांपूरता मर्यादित असा उपाय आहे. यामुळे कालांतराने केस अधिक रुक्ष होतात. तसचं ते निस्तेज दिसू लागतात. यासाठीच आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक पर्याय सांगणार आहोत
white hair causes and solution
white hair causes and solutionEsakal

White Hair Causes & Solution: अलिकडे बदललेली जीवनशैली, आहाराच्या Diet चुकीच्या सवयी तसंच वाढत्या प्रदूषणामुळे Pollution कमी वयातच केस पांढरे होणं ही एक सामान्य समस्या निर्माण झाली आहे.

अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून तरुणांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या दिसू लागली आहे. White Hair Home Remedies How To Get Naturally Black Hair

त्यात केसांसाठी वापरण्यात येणारे शॅम्पू Shampoo आणि इतर प्राॅडक्टमध्येही केमिकल्सचा वापर वाढू लागल्याने देखील केस पांढरे Gray Hair होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.  पांढरे केस काळे करण्यासाठी तसचं तर बाजारामध्ये अनेक प्राॅडक्ट उपलब्ध आहेत.

हेअर डाय किंवा हेअर कलर करून केस काळे करणं शक्य असलं तरी हा काही दिवसांपूरता मर्यादित असा उपाय आहे. यामुळे कालांतराने केस अधिक रुक्ष होतात.

तसचं ते निस्तेज दिसू लागतात. यासाठीच आम्ही तुम्हाला काही असे नैसर्गिक पर्याय सांगणार आहोत  ज्यामुळे तुमचे केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल. White hair problem

तुमच्या घरात किंवा तुमच्या किचनमध्येच उपलब्ध असलेल्या तसंच बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या काही सामुग्रीपासून तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकता. यामुळे केसांचं नुकसानही होणार नाही. White hair home remedies 

हे देखिल वाचा-

white hair causes and solution
Green Tea Herbal Shampoo : Smooth & Silky केसांसाठी घरीच तयार करा शॅम्पू, केस करतील शाइन

आवळा- आवळ्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासाठी मदत होते. यासाठी आवळ्याची ३-४ फळं घेऊन त्याच्या बिया काढाव्यात. मिक्सरमध्ये आवळ्याची पेस्ट तयार करून घ्यावी. त्यानंतर एका बाऊलमध्ये आवळ्याची पेस्ट तसचं त्यात एक चमचा बदाम तेल आणि एक चमचा मध टाकून मिश्रण तयार करावं. Home remedies for white hair 

तयार हेअर मास्क केसांना आणि केसांच्या मुळांना अर्धा तास लावून ठेवावा, अर्धा तासांनी केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल. तसचं या हेअर मास्कमुळे केसांनी कंडिशनिंग देखील होईल. 

काळा चहा- खरं तर अनेक ठिकाणी मूड फ्रेश होण्यासाठी आणि झोप उडवण्यासाठी ब्लॅक टीचं म्हणजेच काळ्या चहाचं सेवन केलं जातं. मात्र हाच काळा चहा तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो.

यासाठी एका पातेल्यामध्ये जवळपास एक मग भरून पाणी आणि त्यात २ चमचे काळी चहापत्ती टाकून चांगलं उकळू द्यावं. जवळपास ५ मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करावा. Hair care 

हे चहाचं पाणी गार होवू द्यावं. त्यानंतर केस धुतल्यानंतर स्वच्छ केसांवर हे पाणी टाकावं. १०-१५ मिनिटं चहापत्तीचं पाणी केसांना तसंच राहू द्यावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा केस धुवावे. आठवड्यातून किमान दोन वेळा हा प्रयोग केल्यास तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल. 

हे देखिल वाचा-

white hair causes and solution
Bananas for Hair Growth: लांब केस हवेत? मग केळीच्या सालीचा असा वापर करून पाहा

राजगिऱ्याची पानं किंवा राजगीरा- यासाठी राजगिऱ्याची पानं किंवा राजगिरा वाटून घ्या. त्यानंतर राजगीऱ्याच्या पानांची पेस्ट केसांना लावा. ही पेस्ट केसांना जवळपास एक ते दीड तास राहू द्या.

त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. तसचं यामुळे केसांची वाढ देखील होण्यास मदत होईल. 

कॉफी आणि काळे तीळ- कॉफी आणि काळ्या तीळाच्या मदतीने देखील तुमचे केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल. दोन चमचे काळ्या तिळाची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यावी.

त्यानंतर एक कपभर पाण्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर टाकावी. यात २ चमचे लिंबाचा रस मिसळावा. यात काळ्या तिळाची पावडर टाकावी. Natural hair dye 

तयार पेस्ट केसांना अर्धा तास लावून ठेवावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस मुळापासून काळे तसचं मजबूत होण्यास मदत होईल.

त्यामुळे जर तुम्ही देखील पांढरे केस काळे करण्यासाठी सतत केमिकलयुक्त हेअर डायचा वापर करत असाल तर त्याऐवजी हे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट देतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com