esakal | MET Gala 2021 : पहिल्यांदा रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या सुधा रेड्डी आहेत कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

MET Gala 2021 : पहिल्यांदा रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या सुधा रेड्डी आहेत कोण?

MET Gala 2021 : पहिल्यांदा रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या सुधा रेड्डी आहेत कोण?

sakal_logo
By
शरयू काकडे

बहुप्रतिक्षित आणि सर्वात मोठ फॅशन इव्हेंट म्हणून ओळखला जाणारा MET Gala नुकताच पार पडला. या सोहळ्यात सेलिब्रिटी त्यांचे सर्वात बेस्ट ड्रेस परिधान करतात. दरवर्षी मे महिन्यात होणारा हा सोहळा कोरोनामुळे सप्टेंबर महिन्यात पार पडला. या सोहळ्यामध्ये जगभरातील सेलिब्रिटी सहभाग घेतात. भारताच्या सुधा रेड्डी या यावर्षी पहिल्यांदा MET Gala मध्ये सहभागी झाल्या आहेत. यंदा MET Gala मध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये सुधा रेड्डी या एकमेव भारतीय आहेत

सुधा रेड्डी या हैद्राबादमधील बिलेनियर बिझनेसमन मेघा कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत. यंदा सुधा रेड्डी यांच्या पदार्पनामुळे त्या MET Gala ची आतूरतेने वाट पाहत होत्या. डिझाईनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनीसुधा रेड्डी यांच्यासाठी हाऊट कॉचर गाउन डिझाईन केला आहे. सुधा रेड्डी या मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) संचालक देखील आहेत. तसेच सुधा यांनी इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये कला, फॅशनच्या त्या उत्साही जाणकार असल्याचं लिहले असून त्या परोपकारी आणि दानशूर स्वभावासाठी ओळखल्या जातात.

MET Galaच्या सोहळ्यामध्ये प्रियांका चोप्रा, दिपिका पादूकोन, ईशा अंबानी सारख्या सेलिब्रिटींनी यापूर्वी हजेरी लावली होती. पण यंदा मेट गालामध्ये सहभागी झालेल्या चित्रपट सृष्टीमध्ये नसलेल्या सुधा मुर्ती या भारतातील एकमेव व्यक्ती आहेत.

रेड कारपेट लूकसाठी सुधा यांनी चमचमता सुंदर गाऊन परिधान केला आहे. सुधा यांच्या उदार व्यक्तीमत्वला शोभेल असा हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल 250 तास वेळ लागल्याची माहिती डिझाईनरने दिली. आम्ही नवीन लष्कर प्रेरित लुक तयार केला असून तो मेट गालाच्या थीमला साजेसा असाच आहे अशी माहिती डिझाईनर फाल्गूनी आणि शेन पिकॉक यांनी दिली.

बॉडी फिट गाऊनवर अमेरिकन राष्ट्रीय ध्वजाची छटा साकारली असून त्यावर सोनेरी, लाल आणि नेव्ही ब्लू स्वारोवस्की क्रिस्टल, मणी वापरून डिझाईन केला आहे. अॅक्सेसरीजसाठी सुधाने ज्वेलरी डिझायनर फराह खानच्या कस्टम-मेड पीसची 'ड्रीमी डिकॅडेन्स' निवड केली आहे. अमेरिकेच्या 50 गौरवशाली स्वतंत्र राज्यांचे प्रतीक असलेल्या अमेरिकन ध्वजातील प्रेरणा घेऊन ड्रेस डिझाईन केला आहे. तसेच डायमंड एन्क्रस्टेड खड्यांपासून मोहक असे ईयर कफ डिझाइन केले आहेत जे 18 कॅरेट गोल्ड आणि 35 कॅरेट हिऱ्यांचा समावेश केला आहे.

loading image
go to top