

Fix your AC setting!
esakal
Why 24°c is best for AC: अनेक जण घरात किंवा ऑफिसमध्ये येताच एसीचे तापमान थेट १८ अंशांवर (18°C) सेट करतात. यामुळे रूम लवकर थंड होईल असा अनेकांचा समज असतो. पण, केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी'नुसार (BEE) ही सवय तुमच्या वीज बिलावर मोठा भार टाकणारी ठरू शकते. सरकारनुसार, भारतातील वातावरणासाठी एसीचे २४°C हे अत्यंत योग्य आणि आदर्श तापमान आहे.