April Fools' Day 2023: राजा-राणीची लग्नाची तारीख फसली आणि जगाला फूल बनवणारा दिवस जन्माला आला

त्यांच्या साखरपु़ड्यासाठी ३२ मार्च १३८१ ही तारीख ठरली होती. ही बातमी ऐकल्यावर लोक खूप खुष झाले
April Fools' Day
April Fools' Day google

मुंबई : जगभरात १ एप्रिल हा दिवस April Fools Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक शाळेत, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा घरात एकमेकांना मूर्ख बनवत असतात. त्यासाठी ते विविध पर्याय अवलंबतात आणि मजा घेतात.

१ एप्रिलला लोकांनी कशाप्रकारे मजा करत लोकांना मुर्ख बनवले याच्या अनेक रंगतदार गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला हा दिवस का साजरा केला जातो ते माहितेय का ? या दिवसाचा इतिहास जाणून घ्या. (why April Fools' Day is celebrated story behind April Fools' Day )

पहिली कथा

जाणकारांच्या मते, १३८१ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. इंग्लंडचा राजा दुसरा रिचर्ड (Richard II) आणि बोहेमियाची राणी ऐनी (Anne, Queen of Bohemia) यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती.

त्यांच्या साखरपु़ड्यासाठी ३२ मार्च १३८१ ही तारीख ठरली होती. ही बातमी ऐकल्यावर लोक खूप खुष झाले. त्यांनी आनंद व्यक्त केला. नंतर त्यांना कॅलेंडरमध्ये ३२ ही तारीख नसतेच अशी जाणीव झाली.

म्हणजेच सर्वांची मजा घेण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या १ तारखेला एप्रिल फूड डे साजरा करण्यास सुरूवात झाली.

दुसरी कथा

असे म्हणतात की फ्रान्समुळे एप्रिल फूलची सुरूवात झाली. १५८२ साली चार्ल्स पोप (Charles Pope) यांनी जुने कॅलेंडर बदलून त्याजागी रोमन कॅलेंडर (Roman calendar) सुरू केले होते. तरीही अनेक लोक जुन्या कॅलेंडरचा वापर करायचे. जुन्या कॅलेंडरचा वापर करूनच नवे वर्ष साजरे केले जायचे. त्यामुळेच एप्रिल फूल डे साजरा करायला सुरूवात झाली असे म्हणतात.

भारतात कधी झाली सुरूवात ?

काही रिपोर्टनुसार, भारतात ब्रिटिशांनी १९व्या शतकात हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत हा साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित मीम्स आणि जोक्सही दरवर्षी व्हायरल होतात. मात्र, कोणाशीही विनोद करताना, तो विनोद जीवघेणा ठरणार नाही, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com