Promise Day का साजरा करतात? पार्टनरला द्या 'हे' ५ वचन नातं होईल सुंदर | Why We Celebrate Promise Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Why We Celebrate Promise Day

Promise Day का साजरा करतात? पार्टनरला द्या 'हे' ५ वचन नातं होईल सुंदर

Valentine’s Week: व्हॅलेटाईन विक ७ फेब्रुवारीला सुरुवात झाली आणि १४ फेब्रुवारीला संपणार आहे. या आठवड्यात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या स्वरुपामध्ये साजरा केला जातो. रोज डे नंतर येतो प्रॉपोज डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, आणि त्यानंतर व्हॅलेनटाई डे. व्हॅलेटाईन वीकमध्ये पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो, कपल्ससाठी सर्वात खास दिवस असतो. चॉकलेट डे आणि टेडी डे नंतर ११ फेब्रवारीला प्रॉमिस डे साजरा केला जाते आणि कपल एकमेकांना प्रॉमिस करतात. नात्यामध्ये पार्टनरच्या प्रॉमिस करण्यामुळे नातं आणखी घट्ट होत. त्यासाठी कपल्स खूप आंनदाने हा दिवस साजरा करतात. प्रॉमिस डे का साजरा करतात आणि या दिवशी पार्टनरला कोणते प्रॉमिस करायला पाहिजे, जाणून घ्या. (Why We Celebrate Promise Day)

promise

promise

प्रॉमिस डे का साजरा करतात (Why do we celebrate promise day)

प्रॉमिस डे या दिवशी कपल्स एकमेकांना प्रॉमिस करतात त्यामुळे एकमेकांसोबतचे नातं आणखी घट्ट करण्यासाठी होते. त्यामुळे नात्यामधील हा दिवस व्हॅलेंटाईन वीकमध्ये उत्साहात साजरा केला जातो. प्रॉमिस करण्यामुळे नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो आणि नातं दृढ होते.

प्रॉमिस करण्याचे महत्त्व काय असते प्रत्येकाला माहित आहे त्यामुळे केलेले प्रॉमिस कधीच तोडू नये. तुम्ही जर कधी काही चूकीचे काही करत असला तर पार्टनरला केलेले तुम्हाला प्रॉमिस आठवते, ज्यामुळे आपण चूकीचे काम करत नाही. विश्वास निर्माण करण्यासाठी कित्येक वर्ष लागतात पण तुटण्यासाठी काही सेंकदही लागत नाही त्यामुळे कधीही कोणालाही केलेले प्रॉमिस तोडू नये

couple

couple

प्रॉमिस डेला पार्टनरला करा हे प्रॉमिस

आनंदी ठेवण्याचे प्रॉमिस : प्रत्येक नात्यामध्ये सर्वात महत्त्वाचे असतो आनंद. काही लोक नात्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टींवरून दुखी होतात, त्यामुळे तुम्ही पार्टनर दुखी होऊ देणार नाही आणि असे कोणतेही काम करणार नाही ज्यामुळे तो दुख होईल. त्यामुळे या दिवशी पार्टनर स्वत:ला खूश ठेवण्यासाठी प्रॉमिस नक्की करा.

सन्मान देण्याचे प्रॉमिस : नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना सन्मान देणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या नात्यामध्ये सन्मान नसतो ते नाते टिकत नाही, मग ते नवरा बायकोचे नातं असो की गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडचे. त्यामुळे पार्टनरच्या बाबतीत चुकुनही असे शब्द बोलू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखावेल.

lover couple

lover couple

साथ देण्याचे प्रॉमिस : सुखामध्ये प्रत्येकजण साथ देतो पण आपली माणसे तेव्हाचओळखता येतात जेव्हा वाईट परिस्थिती येते. त्यामुळे नेहमी आपल्या पार्टनरसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचे साथ देण्याचे प्रॉमीस करा आणि जितके शक्य असेल तितकी मदत करा.

चूका समजून घेण्याचे प्रॉमिस करा : नात्यामध्ये प्रत्येक परिस्थिती बदलत राहते त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन पार्टनरसोबत राहण्याचे प्रॉमिस केले. त्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत आंनदी राहू शकेल.

प्रेम करण्याचे प्रॉमिस : नात्यामध्ये प्रेम खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे जोडीदाराला प्रॉमिस करा की, तुमचे प्रेम त्याचसाठी कधीही कमी होणार नाही.