मुलांना जन्म न देण्याचा कपल्स का करतायत विचार? जाणून घ्या

मुलांना जन्म न देण्याचा कपल्स का करतायत विचार? जाणून घ्या

आज जगभरातील जोडपी अपत्यमुक्त राहणे निवडत आहेत. भारताचा प्रजनन दर 2 पर्यंत खाली आला आहे, असे नव्या सर्वेक्षणात म्हटले आहे. याचा अर्थ प्रत्येक जोडपी फक्त दोनच मुलांना जन्म देऊन कुटूंब पुढे नेत आहेत. लोकांची जगण्याची क्षमता जास्त असल्याने देशाची लोकसंख्या काही काळ वाढू शकते.

नोकरी, घर आणि आरोग्य सुघारण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट बघून अनेक लोक निराश आहेत. हे प्रमाण वाढतेच आहे. नॅशनल फॅमिली हेल्थने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण प्रजनन दर 2.1 च्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली.

भारतात कमी होत असलेल्या जननदरामागे महिला सक्षमीकरण, गर्भनिरोधंकांची जागृती आणि महिलांची एकूण शैक्षणिक प्रगती अशी काही कारणे देखील आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जननदर प्रति महिले मागे सरासरी २.१, म्हणजे असलेली लोकसंख्या कायम ठेवायला लागणाऱ्या दरापेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. शहरी भागांत सरासरी १.६ तर ग्रामीण भागांत प्रति महिलेमागे २.१ इतका जननदर आहे. चाईल्डफ्री म्हणजे अपत्यमुक्त जीवनशैली चढत्या प्रमाणात दिसून येत आहे. जोडपी असा विचार का करतात, याचा व्हिडिओ ग्राविटाज प्लसने शेअर केला आहे.

मुलांना जन्म न देण्याचा कपल्स का करतायत विचार? जाणून घ्या
लग्नानंतर नवरीसमोर येतात 'या' अडचणी; अशी घ्या काळजी

का निवडतात हा मार्ग?

जगभरातील जोडपी अनेक कारणांमुळे मुलांना जन्म देणे टाळत आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. महत्वाचे म्हणजे हवामान संकट आणि जगाच्या भवितव्याबाबतच्या चिंतेमुळे अनेक तरूण गंभीरपणे मुलं होऊ न देण्याचा विचार करत आहे. हवामान बदलाविषयी जे चिंतेत आहेत त्यांनी तर मुले होऊ न देण्याचे ठरवले आहे. काहीजण वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी मुलांना जन्म देणे टाळत आहेत. तसेच, अनेक विचारही या मागे आहेत, ते म्हणजे मुलाला जन्म देऊन त्याला आपण सुखकर आयुष्य देऊ शकतो का? भविष्यात कोरोनासारखी महामारी आल्यास मुलाच्या आय़ुष्यावर का परिणाम करायचा? कपल्सचे वय जास्त असेल तर मुल मोठं झाल्यावर ते त्याला नीट वाढवू शकतील का? तंत्रज्ञान आणि जीवनशैली बदलल्यामुळे आयुष्यात ज्या अडचणी येत आहेत त्या मुलांना त्रासदायक ठरू नयेत. असे अनेक विचार जोडपी करत आहेत. तसेच आजकाल अनेक महिलाही मुलांना जन्म देण्यात अनुकूल नसल्याचे दिसते आहे.

मुलांना जन्म न देण्याचा कपल्स का करतायत विचार? जाणून घ्या
तुमच्या पार्टनरबाबत तुम्हाला मत्सर वाटतो? 'अशी' बदला वाईट सवय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com