Bride Age : वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागे काही शास्त्रीय कारण आहे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Groom Age

Bride Age : वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

Scientific Facts : साधारणत: लग्नात वधूचे वय वरापेक्षा लहान असणे हे भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्षे चालत आले आहे. तसा समाजाचाही समज झालाय. मात्र खरंच वधूचे वय हे वरापेक्षा लहान असावे का? यामागे काही सायन्टिफिक रिझन आहे काय की ही फक्त मान्यता आहे. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळतील. आणि तुमचे गैरसमजही दूर होतील.

काय आहे खरे कारण?

खरं तर यामागे कुठलेही शास्त्रीय कारण नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते हा केवळ गैरसमज आहे. विशेष म्हणजे गुजराती लोकांत मुलींचेच वय जास्त असते, मात्र तिथे याबाबतीत काही अडचण नसते. खुद्द तेंडुलकरची बायको त्याच्या पेक्षा 5 वर्ष मोठी आहे त्यांचे व्यवस्थित चालले आहे न,ऐश्वर्या रॉय अभिषेक पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे त्यांचे पण व्यवस्थित चालले आहे. तेव्हा या प्रत्यक्ष उदाहरणांसमोर वराचे वय हे वधूपेक्षा मोठे असावे ही परिभाषाच चुकीची वाटते. (Bride)

तर डॉक्टरांच्या मते,

आधुनिक मानसशात्रज्ञांनी असा दावा केलेला आहे की २१ वर्षे वयाच्या मुलाचे "मानसिक वय" हे १८ वर्षाच्या मुलीच्या मानसिक वयाइतके असते. "मानसिक वय" सारखे असलेला मुलगा आणि मुलगी यांचा विवाह झाल्यास त्यांच्या विवाहोत्तर आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीही सारखी राहते.

आणि त्यामुळे त्यांचे विवाहित आयुष्य सुख-समृद्धीचे जाण्यात मदत होते. म्हणून लग्नात वधूचे (शारीरिक) वय हे वराच्या (शारीरिक) वयापेक्षा ३ ते ५ वर्षाने कमी असावे अशी प्रथा आहे. (Lifestyle)

हेही वाचा: Couple Lifestyle : लग्न ठरलेल्या जोडप्यांनी या बदलांना रहावे तयार; तरच टिकेल नातं

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.