esakal | सर्वसामान्यांप्रमाणं मृत्यूनंतर साधूंचं दहन का केलं जात नाही? जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्यांप्रमाणं मृत्यूनंतर साधूंचं दहन का केलं जात नाही? जाणून घ्या...

सर्वसामान्यांप्रमाणं मृत्यूनंतर साधूंचं दहन का केलं जात नाही? जाणून घ्या...

sakal_logo
By
शरयू काकडे

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचं आज शवविच्छेदन पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह आप्तेष्टांकडे सोपवण्यात येईल. आज दुपारी पोस्टमॉर्टेमनंतर गिरी यांच्या मृतदेहाला भूसमाधी दिली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अंत्य संस्कार करताना लोकांचे दहन केले जाते. मग, नरेंद्र गिरी यांना दफन का करण्यात येत आहे हे जाणून घेऊ या...

हेही वाचा: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

साधूंना पवित्र आत्मा मानले जाते. हिंदू धर्म माननरे लोक आत्माच्या अस्तिवावरही विश्वास ठेवतात. मृत्यूनंतर तो आत्मा स्थानांतरीत होतो असेही मानले जाते. पुनर्जन्म तेव्हाच होतो जेव्हा आत्मा कोणतीही व्यक्ती जीवनचक्रादरम्यान सर्व बंधनातूनक मुक्तो होतो असे मानले जाते.

मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा तोपर्यंत बंधनात अडतून राहतो जोपर्यंत तो नश्वर अवशेष भौतिकरूपात उपलब्ध असतात. हिंदू मान्यतेनुसार शरीराचे अंतिम संस्कार केल्यामुळे संसारिक बंधन संपतात. त्यामुळे आत्माला संसारिक गरजांमधून तो मुक्त होणाचा मार्ग मिळतो.

हेही वाचा: मुलीसोबत मॉर्फ फोटो, शिष्यच महंत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करत होता?

एक संन्यासी सर्व संसारिक बंधनाचा आणि सुखांचा त्याग करुन संत बनतात. अशा व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा असे मानले जातेकी संन्यासी भौतिक शरिर सोडून देतात आणि मृत्यूनंतर कपाळ मोक्षद्वारे अमरता प्राप्त करतात. साधू-संताचे प्राण एका दिव्य मार्गाद्वारे शरिर सोडून देतात असे मानले जाते.

साधू आणि संताबाबत अशी मान्यता आहे की भौतिक शरीर कित्येक बंधनातून मुक्त होते. अशावेळी दहन संस्कारशिवायच त्यांची आत्म्याला मुक्ती प्राप्त होते.

(वरील लेखातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा सकाळ मध्यम समूहाचा उद्देश नाही)

loading image
go to top