Kids Personality Developement
Kids Personality Developement esakal

Kids With Grandparents : मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ घालवणं का महत्वाचं? जाणून घ्या

लहान मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ घालवणे का महत्वाचे आहे ते जाणून घेऊया.

Kids Personality Development : हल्ली लोकांना सिंगल फॅमिली हवी असते. कुठल्याही त्रासाशिवाय आपल्याला आरामात जगता येईल ही त्यामागची विचारधारणा असते. पण या विभक्त कुटुंबाचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. त्यांच्यासाठी आजी-आजोबा यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. हल्ली मुलं जास्त वेळ मोबाईल, टीव्ही आणि गॅजेट्सवर घालवतात. त्यामुळे ते टेक्निकली विकसित होत असले तरी त्यांच्या आंतरिक विकास होण्यासाठी भावनिक नातं आणि कुटुंबासह घालवलेला वेळ जास्त महत्वाचा असतो.

लहान मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ घालवणे का महत्वाचे आहे ते जाणून घेऊया.

आजी-आजोबांसोबत राहिल्यास मुले अधिक व्यस्त राहतील आणि काहीतरी नवीन शिकतील. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होते. या कारणांमुळे मुलांनी आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे.

सांस्कृतिक मूल्य समजून घ्या

जेव्हा मुलं आजी-आजोबांसोबत राहतात आणि जास्त वेळ घालवतात तेव्हा त्यांना त्यांच्या चालीरीती अधिक समजतात आणि कळतात. मुले त्यांच्यासोबत वेळ घालवत सांस्कृतिक मूल्यांचं महत्व शिकतात आणि आणखी बऱ्याच नवीन गोष्टी शिकतात. सण कसे साजरे करावे आणि प्रथा काय आहेत, ही माहिती फक्त तुमच्यापुरतीच मर्यादित राहत नाही, तर तुमच्या मुलांनाही ती सहज मिळते.

मुले गोष्टी शेअर करतात

मुले आजी-आजोबांसोबत असतात तेव्हा त्यांचे जीवन सुकर होते. कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की ते आई-वडिलांना सांगायला घाबरतात. पण त्याच वेळी ते आपल्या आजी-आजोबांना अगदी सहजपणे सांगतात. यामुळे मुलाला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होते. आजी आजोबांसोबत हसत खेळत वाढणारी मुले अनावश्यक ताण तणावापासून दूर राहतात.

मानसिक विकास होतो

मुलं आजी-आजोबांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांचा मानसिक विकास होतो. दिवसभर एकटे असणारी मुलं आजी-आजोबांसोबत मजा करतात आणि नवीन गोष्टी शिकतात. कामाच्या व्यापामुळे पालक मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुलं आजी-आजोबांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांचा मानसिक विकास होतो. (Lifestyle)

Kids Personality Developement
Personality Test : अय्यो, इवलीशी करंगळीही सांगते तुमचा स्वभाव

शिकण्याची संस्कृती

परदेशातील लोकांनाही भारतीय समाजातील संस्कार आवडतात. पण आता आपल्या समाजातील लोक त्यांना विसरत चालले आहेत. मुलं आजी-आजोबांसोबत राहतात तेव्हा ते शिष्टाचार शिकतात. देवाची प्रार्थना करणे, मोठ्यांचा आशीर्वाद घेणे, सर्वांचा आदर करणे, हे सर्व संस्कार आजी-आजोबांसोबत राहिल्यास मुले सहज स्विकारतात. (Family)

Kids Personality Developement
Monsoon Diet For Kids : पावसाळ्यात लहान मुलांचा आहार कसा असावा?

नैतिक विकास

आजी-आजोबांसोबत राहून मुलांना नैतिक शिक्षणही मिळते. आजी-आजोबा मुलांना नैतिक शिक्षण म्हणजे काय हे कथा, कविता आणि भाषणातून शिकवतात. त्यामुळे मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ घालवणे फार महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com