जीन्सवर छोटी बटण का असतात? जाणून घ्या इतिहास

jeans
jeansesakal

तुम्ही कधी विचार केलाय का की जीन्सची डिझाइन (jeans small buttons) अशी का आहे? आपण कधी जीन्सबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? आपण कधीही विचार केला आहे की जीन्सच्या पॅंटच्या खिशांवर (jeans pockets) बनवलेल्या छोट्या बटणाचे काम काय आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर आश्चर्यचकित व्हाल की यामागे एक मोठे कारण आहे.

छोट्या बटणामागील इतिहास

सुरुवातीला कामगार मोठ्या प्रमाणात जीन्स घालत असत. यावेळी जीन्सची पॉकेट्स लवकर फाटत असत. या समस्येवर जॅकोब डेविस नावाच्या टेलरने १८७३ मध्ये तोडगा काढला. जॅकोब अमेरिकेच्या रेनो नेवाडा येथे राहत होता.पॉकेट शिवताना त्या फाटू नयेत यासाठी त्याने तेथे रिवेट्सचा वापर करायचे ठरवले. यामुळे पॉकेट्सच्या दोन्ही बाजूंनी ही रिवेट्स लावली जातात. यामुळे पॉकेट्सची शिलाई अधिक मजबूत राहते.

म्हणून जीन्सवर असतात छोटी बटणे

याच्या पेटंटसाठी जॅकोबकडे त्यावेळी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने सॅन फ्रँन्सिस्कोच्या लेव्ही स्ट्रॉस नावाच्या होलसेलरशी संपर्क केला आणि त्याला पेटंट बनवण्यास सांगितले. २० मे १८७३मध्ये हे पेटंट झाले. १८९०मध्ये हे पेटंट सार्वजनिक करण्यात आले. त्यानंतर कोणीही याचा वापर करु शकत होते. तेव्हापासून आतापर्यंत जीन्सच्या पॉकेटवर छोटी बटणे असतात.

jeans
अखेर आजी-आजोबांनी कोरोनाला हरविले! घरीच उपचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com