जागतिक तंबाखूविरोधी दिन : जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी ८० लाख जणांचा मृत्यू तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे होतो. तंबाखूच्या सेवनाने हृदयरोग, कर्करोग, मधुमेह होतो.
tobacco
tobaccogoogle

मुंबई : जगभर ३१ मे हा दिवस तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखूपासून असलेल्या धोक्याबाबत जनजागृती घडवणे असा या दिवसाचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या दिनासाठी 'पर्यावरणासाठी घातक आहे तंबाखू' अशी संकल्पना दिली आहे.

तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असते. या दिनाच्या निमित्ताने याबाबतची सर्व माहिती नागरिकांना दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी ८० लाख जणांचा मृत्यू तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे होतो. तंबाखूच्या सेवनाने हृदयरोग, कर्करोग, मधुमेह होतो. जाणून घेऊ या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास....

तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे वाढणारे मृत्यू पाहाता जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ साली या दिनाची सुरुवात केली. ७ एप्रिल १९८८ साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला. त्यानंतर ३१ मे १९८८ रोजी WHO42.19 हा प्रस्ताव पारीत झाल्यानंतर दरवर्षी ३१ मे या दिवशी हा दिन साजरा केला जातो.

तंबाखूमुळे होणाऱ्या हानीविषयी लोकांना माहिती देणे असा हा दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. तंबाखू आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे या दिनाच्या माध्यमातून लोकांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

दरवर्षी तंबाखूविरोधी दिनासाठी एखादी संकल्पना ठरवली जाते. गेल्या वर्षी कमिट टू क्वीट अशी संकल्पना ठरवण्यात आली होती. यावर्षी पर्यावरण रक्षण अशी संकल्पना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com