
Breast Bumps : स्तनांवर असणारे बारीक फोड म्हणजे कशाचे लक्षण ? आजच जाणून घ्या
मुंबई : स्त्रिया त्यांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल क्वचितच बोलतात. आपण स्तन किंवा योनीकडे पाहिल्यास, कधीकधी काही गोष्टी आपल्याला खटकतात. जसे स्तनाग्रभोवती लहान फोड.
हे फोड त्वचेवरील लहान मुरुमांसारखे दिसतात, परंतु ते खरोखर काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जगप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. तनया उर्फ डॉ. क्युटेरस यांनी यासंबंधीची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी ब्रेस्ट एरियामध्ये असलेल्या बंप्सबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या बहुतेक महिलांना माहीत नाहीत. (why women have bumps around the breast) हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
हे फोड कोणत्या भागात आढळतात ?
हे फोड खरंतर स्तनाग्राच्या एरोला भागात असतात. स्तनाग्र झाकणारा गडद भाग म्हणजे एरोला. एरोलामध्ये अडथळे तसेच केस असतात. त्यात असलेल्या अडथळ्यांना माँटगोमेरी ग्रंथीचे ट्यूबरकल्स म्हणतात. ते तुमच्या स्तनावर असणे अगदी सामान्य आणि गरजेचे असते.
हे फोड का येतात ?
या फोडांमुळे, तुमच्या निप्पलमध्ये द्रवपदार्थ असतात आणि यामुळेच ते मॉइश्चराइज राहतात. यामधून एक विचित्र वास देखील येतो ज्यामुळे बाळांना अन्न कुठे आहे हे कळते. तुमच्या स्तनांवरील त्वचा त्यांच्या अनुपस्थितीत फ्लॅकी आणि क्रस्टी होईल.
प्रत्येकाच्या छातीवर हे फोड असतात का ?
होय, हे फोड प्रत्येकाच्या छातीवर असतात. ते पुरुषांच्या स्तनाग्र भागात हलके असतात, परंतु स्त्रियांच्या स्तनाच्या भागात ते अधिक ठळक असू शकतात.
काही स्त्रियांना मासिक पाळीनुसार त्याचे स्वरूप कमी-अधिक प्रमाणात दिसू शकते. हे पिंपल्स नसून ग्रंथी आहेत आणि त्यामुळे त्यांना वाईट किंवा त्वचारोग समजणे चुकीचे ठरेल.
जर तुमच्या स्तनाग्रांवर केस असतील तर ते देखील या ग्रंथींमुळेच आहे. हे कमी किंवा जास्त हार्मोनल पातळीमुळे होऊ शकते.
हे फोड कधी सामान्य नसतात ?
काहींच्या स्तनावरील फोड जास्त गुलाबी असतात. त्यात वेदना होतात. हे फोड आवश्यकतेपेक्षा मोठे असतात. काही वेळा स्तनाग्रांमधून द्रव गळतो. त्यातून खपल्या निघतात.
ही लक्षणे असल्यास संसर्ग झालेला असतो. हे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. असे काही होत असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन तुमची समस्या सांगा.