लग्नानंतर का वाढतं मुलींचं वजन?; जाणून घ्या कारण

वजन वाढलेल्या स्त्रियांना सल्ले देण्यापेक्षा जाणून घ्या त्यांची समस्या
weight
weighte sakal

सध्याच्या काळात वाढतं वजन ही अनेकांची समस्या झाली आहे. यामध्येच लग्न (Marriage) झाल्यानंतर अनेक स्त्रियांचं (Women) वजन झपाट्याने वाढू लागतं. त्यावरुन अनेकदा त्यांनीा ट्रोलदेखील केलं जातं. परंतु, लग्न झालेल्या स्त्रियांचं वजन का वाढतं याविषयी कधी विचार केला आहे का? अर्थात कोणीच याचा विचार केला नसेल. केवळ वजन वाढलंय म्हणून त्या स्त्रिची खिल्ली उडवली जाते, तिला सल्ले दिले जातात. पण, आपण करत असलेल्या या गोष्टींमुळे त्या स्त्रीवर कोणता परिणाम होतोय हे कोणीच समजू शकत नाही. मुळात अचानक वजन वाढल्यामुळे तीदेखील थोडीशी नैराश्यात गेली असते. त्यातच लोकांचे बोल ऐकून तिचा आत्मविश्वास आणखीनच कमी होऊ लागतो. म्हणूनच, लग्नानंतर स्त्रियांचं वजन का वाढतं याविषयी जाणून घेऊ. (why-womens-weight-gain-after-marriage-reasons)

१. डाएटमध्ये झालेला बदल -

लग्नापूर्वी प्रत्येक मुली स्वत: डाएट नीट फॉलो करत असते. वेळात जेवणं,व्यायाम करणं, मोजक्याच पदार्थांचा आहारात समावेश करणं हे सारं ती नित्यनियमाने करत असते. मात्र, लग्नानंतर तिचं डाएट पूर्णपणे कोलमडून जातं. जेवणाच्या वेळा चुकतात, घरातील काम करण्याच्या नादात तिचा वर्कआऊट राहतो. कोणत्याच प्रकारचं डाएट ती नीट फॉलो करु शकत नाही. त्यामुळे तिचं वजन वाढू लागतं.

weight
एलियनवर प्रेम असल्याचा महिलेचा दावा; म्हणाली, 'माणसांपेक्षा....'

२. तणाव -

लग्नानंतर स्त्री जितकी आनंदी असते, तितकाच तिच्यावर ताणदेखील असतो. कारण, नवे लोक, नवं वातावरण या सगळ्याचं तिच्यावर दडपण असतं. आपल्याकडून एखादी चूक झाली तर काय होईल हा विचार तिच्या मनात सतत असतो. त्यामुळे या तणावाचा परिणाम तिच्या शरीरावर होत असतो. सतत विचार, चिंता केल्यामुळे जेवणाकडे नीट लक्ष दिलं जातं नाही. त्यामुळे बऱ्याचदा पानात जे पडेल ते मुली खातात. स्वत: कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

३. मेटाबॉलिक रेट कमी होणं -

साधारणपणे वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरातील मेटाबॉलिक रेट कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या वजनावरही होतो. आजकाल मुलींची लग्न २७- २८ व्या वर्षी होतात. त्यामुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी होण्यास सुरुवात झालेली असते.

weight
ऑफिसमध्ये चुकूनही अशा पद्धतीने नका वागू

४. जास्त प्रेम-

अनेक घरांमध्ये सुनेला मुलीप्रमाणेच वागवलं जातं. ही एका अर्थाने चांगली गोष्टी आहे. परंतु, काही वेळा याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर होतो. अनेकदा घरातल्यांचं मन राखण्यासाठी मुलींना नको असलेले पदार्थदेखील खावे लागतात. किंवा, जास्त प्रेम मिळाल्यामुळे मुली सुस्त होतात. परिणामी, वजन झपाट्याने वाढू लागतं. त्यामुळे घरात प्रेम कितीही मिळालं तरीदेखील तुमचा वर्कआऊट आणि डाएट कधीच चुकवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com