
Winter For Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी का वाजते? कारण...
Winter Health Fact: देशात थंडी वाढली असून जो तो बाहेर निखण्याआधी स्वेटर, शॉल हे सगळे हिवाळी कपडे जवळ ठेवतातच. पर्वतीय भागात थंडीचं प्रमाण आणखी जास्त असतं. मात्र तुम्हाला माहितीये काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना का जास्त थंडी वाजते ते. चला तर आज आपण यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊया.
डॉक्टरांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी वाजते. याचे कारण म्हणजे महिलांची शारीरिक रचना. ज्यामुळे त्यांना थंडी जास्त वाजते.
या कारणांनी महिलांना जास्त थंडी वाजते
मेडिकल रिपोर्ट्स अनुसार महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी मेटाबोलिझम असते. मेटाबोलिझमचे काम शरीरातील ऊर्जेचा स्तर नियंत्रत ठेवणे हा आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मोटाबोलिझम लेवल कमी असते. याच कारणाने महिलांना जास्त थंडी वाजते.
महिलांमध्ये मांसपेशी कमी असतात
दुसरं कारण म्हणजे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत मसल्स कमी असतात. मांसपेशी शरीराला गरम ठेवण्यास मदत करते. अशा वेळी महिला लवकर थंडीने कुडकुडतात. खोलीतील तापमानाबाबत बोलायचं झाल्यास खोलीचं तापमान 20-22 डिग्री सेल्सियस असावे.
अशा स्थितीत डॉक्टरांना जरूर दाखवा
डॉक्टरांच्या मते, थंडीमध्ये ऊन्हात उभे राहूनही तुम्हाला थंडी वाजत असेल तर शरीरात शारीरिक समस्या असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांना जरूर दाखवा. हे शरीरात मोठ्या आजाराचं कारणही ठरू शकतं. तेव्हा वेळीच सावध होत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.