Cold Wave : थंडी मे गर्मी का एहसास, हिवाळ्यात 'या' ४ टिप्सने घ्या सेक्सचा उत्कट आनंद

काही अशा सेक्स ट्रिक्स आहेत ज्या खास हिवाळ्यात प्रेम करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. जाणून घ्या
winter sex
winter sexesakal

Winter Sex Tips : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत लोकांचा मूड पण रोमँटीक झालेला असतो. पण जेव्हा थंडी खूपच वाढलेली असते तेव्हा लोक सेक्स करायचं टाळतात. पण थंडीत सेक्स करणं जेवढं रोमांचक असतं तेवढंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं. एकाच ब्लँकेटमध्ये सेक्स करणं नक्कीच रोमांचक ठरू शकतं.

winter sex
winter sexesakal

पायात मोजे घाला

हिवाळ्यात पायात लांब मोजे घालावे. मांड्यांपर्यंतचे लांब मोजे सुध्दा उपयुक्त ठरतात. असं काही जे तुमच्या पायांना गरम ठेवतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा महिलांचे पाय गरम राहतात तेव्हा त्यांना सेक्समध्ये उत्कटता वाढून तो चरम आनंद मिळण्याची शक्यता वाढतं. थंडीत पाय गार पडतात. हे तापमान राखण्यासाठी मोजे मदत करतात.

ओरल सेक्सच्या आधी गरम चहा प्या

ओरल सेक्सच्या दरम्यान करायची एक मजेशीर ट्रीक आहे. एक कप चहा बनवून प्या. एक घोट घ्या. तोंडात सगळीकडे घोळा. त्यामुळे चहाची गर्मी तोंडाला येऊन ओरल सेक्स दरम्यान उत्तम अनुभूती देईल. उबदार फिलींग स्त्री आणि पुरुष दोघांनाचीही उत्कटता वाढवते.

winter sex
winter sexesakal

स्पुनिंग पोझिशनमध्ये ट्राय करा

हिवाळ्यात स्पूनिंगपेक्षा चांगली दुसरी पोझिशन नाही. यामुळे शरीर गरम ठेवण्यास मदत मिळते. यामुळे तुम्ही जोडीदाराच्या खूप जवळ राहू शकतात आणि शरीर अनुभवू शकतात. एका कुशीवर झोपून मागच्या बाजूने पुरुष प्रवेश करू शकतो. यामुळे शरीरात गर्मी निर्माण होते. तुम्ही बोलू शकतात. सेक्सी बोलणं मजा अजून वाढवते.

तेल वापरा

सुगंधी तेलाने जोडीदाराला मसाज द्या. हिवाळ्यात मसाज करणं एक रोमँटिक आणि सुखद अनुभव असतो. यातून तुमच्यात अल्हाददायक सेक्स होऊ शकतो. पण जर तेलाचा उपयोग ल्युब्रिकंट म्हणून करणार असाल तर खास त्यासाठी असणारं तेल वापरा. कोणतही तेल वापरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com