Delhi Market: दिल्लीतल्या मार्केटमधील फक्त पाचशे रुपयाचं फर्स्ट क्लास स्वेटर आता ऑनलाईनही मागवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Market

Delhi Market: दिल्लीतल्या मार्केटमधील फक्त पाचशे रुपयाचं फर्स्ट क्लास स्वेटर आता ऑनलाईनही मागवा

सध्या हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. हिवाळ्यात गुलाबी थंडीत प्रवासाचे अनेक प्लॅन्स केले जातात. दोन-तीन दिवसांची सुट्टी असताना फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत ट्रिपचे प्लॅनिंग केले जाते. पावसाळ्यात सर्वांना रेनकोटची गरज असते तर उन्हाळ्यात सनकोटची.

हिवाळ्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वुलनचे स्वेटर आणि श्रग, लेदर जॅकेट, स्वेटशर्ट यांचा समावेश आहे. (Winter Shopping : wholesale cloth market in delhi for winter shopping)

ट्रिपला जाताना असेल किंवा हिवाळ्यात रेग्युलर वापरण्यासाठी असो स्वेटर खरेदी केले जाते. पण, इतर ऋतूपेक्षा हिवाळ्यात ते अधिक महाग मिळते. त्यामुळे कोणत्या मार्केटमध्ये स्वेटर स्वस्त आणि टिकाऊ मिळतील याचा शोध घेतला जातो.

तुम्हीही अशा जागेच्या शोधात असाल तर आज दिल्लीतील काही मार्केट्स पाहुयात. जिथे क्वालिटी स्वेटर परवडणाऱ्या किमतीत मिळेल. तूम्हाला दिल्लीवरून आणणे शक्य नसेल तर तुम्ही तिथे असलेल्या व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्टकरुन ऑनलाईनही स्वेटर मागवू शकता.

हेही वाचा: LIVE Update: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात! परिसरात बंदोबस्त

नेहरू प्लेस

हे दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध असे मार्केट आहे. येथे स्वेटरचे अनेक ऑप्शन तूम्हाला मिळतील. या मार्केटमध्ये तूम्हाला कुटूंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांसाठी चांगले स्वेटर मिळतील. हिवाळ्यात या नेहरू मार्केटमध्ये वुलनच्या कपड्यांची मोठी उलाढाल होते. त्यामुळे इथे चांगलाच माल ठेवला जातो. त्यांचे रेटही कमी असतात. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार येथे बार्गेनिंगही करू शकता.

गांधीनगर मार्केट

दिल्लीचे सर्वात मोठे मार्केट अशी ओळख असलेले गांधीनगर मार्केट हिवाळ्यातील खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या मार्केटची खासियत म्हणजे इथे एकाच गल्लीत काय हवे ते सगळेच उपलब्ध आहे. प्रत्येक वस्तू एकाच गल्लीत पाहायला मिळेल.

जर तुम्हाला हिवाळ्यासाठी कोट खरेदी करायचा असेल तर येथे तुम्हाला स्वेटर, जीन्स, उबदार पायजमा असे विविध प्रकारचे जॅकेट मिळतील. तेही सर्वात स्वस्त दरात तुम्ही येथे खरेदी करू शकता.

हेही वाचा: Stock Market Closing : सेन्सेक्स 59,959 वर बंद, 'या' क्षेत्रामध्ये झाली घसरण

सेंट्रल मार्केट

सेंट्रल मार्केट हे कपड्यांसाठीचे आशियातील सर्वात मोठ्या मार्केटपैकी एक आहे. सेंट्रल मार्केटला लाजपत नगर मार्केट म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी तूम्हाला नाजूक काम केलेले सुंदर फ्रेश रंगाचे स्वेटर्स मिळतील.

हिवाळा येण्याआधीपासून या मार्केटमध्ये स्वेचर खरेदीसाठी ग्राहकांची गजबज असते. बाजारातही थंडीचे कपडे हिवाळ्यापूर्वीच बनवायला लागतात. तुम्हाला आवडणारे हजार रुपयांचे जॅकेट इथे 500 रुपयांना मिळेल.

चांदणी चौक

दिल्लीतील प्रसिद्ध अशा चांदणी चौकात कापड मार्केट, किनारी मार्केट आणि कटरा नील या तीन बाजारपेठा आहेत. हे भारतातील सर्वात चांगल्या क्वालिटीचे कापड तूम्हाला याच मार्केटमध्ये मिळेल.

या मार्केटमध्ये फर्निचरसाठी होम डेकोर फॅब्रिक असो, ते सर्व तुम्हाला स्वस्त किमतीत या बाजारात सहज मिळू शकते. इतकंच नाही तर इथून थंड कपडेही तुम्ही सहज खरेदी करू शकता. जॅकेट, उबदार कपडे, मफलर, शाली प्रत्येक डिझाईन आणि व्हरायटी चांदणी चौकात मिळतील.