महिलेच्या पार्सलवर शेजाऱ्याचा डल्ला; CCTV मधून झाला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parcel

आठवडाभर महिलेने पार्सल मिळण्याची वाट पाहिली, पण तिला काहीच मिळाले नाही.

महिलेच्या पार्सलवर शेजाऱ्याचा डल्ला; CCTV मधून झाला खुलासा

तुमच्यासोबत असे अनेकदा घडले असेल की, चुकून डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) तुम्हाला शेजाऱ्यांची पार्सल (Parcel) दिली असेल. अशा स्थितीत आपण त्याला योग्य पत्त्यावर पोहोचवतो, पण एका महिलेच्या घराशेजारील व्यक्तीने तसे अजिबात केले नाही. त्याने महिलेची ऑर्डर तिच्या घराबाहेरून चोरली आणि ती स्वतः वापरली.

ऑनलाइन शेअरिंग प्लॅटफॉर्म Redditवर, महिलेने सांगितले की, तिच्या घरी बरेच ड्रेसेस पार्सल येणार होते, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. परंतु, महिलेला तिची ऑर्डर मिळालीच नाही, कारण ते पार्सल आधीच कोणाकडे तरी पोहोचले होते आणि ती व्यक्ती त्याचा वापरही करत होती.

हेही वाचा: दारात पार्सल आलंय? ते घेताना कधीच करु नका 'या' चुका

महिलेने तिचे नाव न सांगता लिहिले आहे की, तिच्या पार्टनरने तिच्या वाढदिवसापूर्वी अनेक ड्रेसेस ऑर्डर केले होते. ती त्या ड्रेसच्या येण्याची वाट पाहत होती. जेव्हा हे कपडे आले नाहीत तेव्हा तिने डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधला आणि ड्रेसेसची डिलिव्हरी झाल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला. याबाबत त्यांनी बिल्डींगमध्ये चौकशी केली असता पार्सल जमा झाल्याचे समोर आले. आठवडाभर महिलेने पार्सल मिळण्याची वाट पाहिली, पण तिला काहीच मिळाले नाही.

हेही वाचा: पुणेकराला आला विचित्र अनुभव; पार्सल मिळालं एका महिन्यानं तेही कमीच

महिला तिच्या पार्सलची वाट पाहत असताना, त्याचवेळी तिच्या घराच्या शेजारी राहणारी व्यक्ती जिममध्ये दिसली. तिने ऑर्डर केल्याप्रमाणे नेमका तोच जिम सेट शेजारच्या व्यक्तीने घातला होता. तो ड्रेस त्या व्यक्तीवर खूप फिटिंग दिसत होता. त्याचवेळी महिलेला शेजाऱ्यावर संशय आल्याने तिने सीसीटीव्ही (CCTV) फुटेज चेक केले. महिलेने फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहिले की, तिच्या शेजाऱ्याने पार्सल चोरल्याचे दिसले. अखेर, बिल्डींगच्या मॅनेजमेंटने दोन्ही महिलांची मीटिंग आयोजित केली असता, शेजाऱ्याच्या व्यक्तीने पहिल्यांदा या गोष्टीला नकार दिला आणि नंतर त्या पार्सलचे पैसे देण्यासही नकार दिला.

Web Title: Woman Ordered Dress But Neighbour Stole The Parcel Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..