esakal | अतिशहाणपणा नडला! मास्कऐवजी रंग लावल्यामुळे फुटलं भांडं
sakal

बोलून बातमी शोधा

अतिशहाणपणा नडला! मास्कऐवजी रंग लावल्यामुळे फुटलं भांडं

अतिशहाणपणा नडला! मास्कऐवजी रंग लावल्यामुळे फुटलं भांडं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला त्याच्या कवेत घेतलं आहे. जवळपास सगळ्याच देशांमध्ये या विषाणूने पाय पसरले आहेत. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन व डॉक्टर वारंवार नागरिकांना सतर्क राहण्याची व काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. या काळात जर कोरोनापासून वाचायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे. मात्र, काही जण याकडे कानाडोळा करतांना दिसत आहेत. आतापर्यत अनेकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले आहेत. परंतु, मास्क वापरण्यास विरोध करणाऱ्या एका मुलीला तिचा हा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. मास्कऐवजी चेहऱ्याला रंग लावल्यामुळे तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरत असतांना मास्क घालणं सध्या अनिवार्य झालं आहे. त्यामुळे पोलिसदेखील या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जागोजागी गस्त घालत आहेत. मात्र, बालीमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन महिलांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. या महिलांनी मास्क वापरण्याऐवजी तोंडावर मास्कसारखा रंग लावला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: ‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक

बालीमध्ये दोन महिला सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असतांना त्यांनी मास्क परिधान केला नव्हता. विशेष म्हणजे मास्क न घातल्याचं कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी या महिलांनी चेहऱ्यावर निळ्या रंगाने मास्कसारखं चित्र काढलं होतं. त्यामुळे लांबून पाहिल्यावर त्यांनी मास्कच घातल्याचं जाणवायचं. परंतु, प्रत्यक्षात तो मास्क नव्हता. जोश पालर लिन आणि लिया अशी या महिलांची नाव आहेत. सध्या या दोघींच्या मास्कशिवाय फिरतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या दोघींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडोनेशियाच्या immigration Department ने या व्हिडीओमागील सत्यता पडताळणी. यामध्ये दोन्ही महिलांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले.

loading image
go to top