गरोदरपणा आणि मानसिक आरोग्य

गर्भधारणेच्या काळात तुमच्या शरीरात विविध प्रकारे बदल होतात. मॉर्निंग सिकनेस, पाठदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे, व्हेरिकोज व्हेन्स, बद्धकोष्ठता, अपचन अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
Women Pregnancy
Women Pregnancy sakal

- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड

गर्भधारणेच्या काळात तुमच्या शरीरात विविध प्रकारे बदल होतात. मॉर्निंग सिकनेस, पाठदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे, व्हेरिकोज व्हेन्स, बद्धकोष्ठता, अपचन अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो. मानसिक आरोग्यावरहीया काळात परिणाम होतो.

काही जणींसाठी, आता पुढे आपले कसे होणार, याची चिंता असते. कदाचित गर्भधारणेबाबत नियोजन केलेले नसते, नवीन बाळाचा तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल, याची काळजी वाटत असते, किंवा कदाचित बाळाच्या जन्माची चिंता असते.

या सर्वसामान्य काळजी आहेत. तुम्हाला तुमच्या गर्भधारणेदरम्यान यापैकी काही किंवा सर्व गोष्टी जाणवू शकतात. परंतु दुःखाच्या, काळजीच्या किंवा चिंतेच्या भावनांचा तुमच्या जीवनावर अधिक परिणाम होऊ लागला, तर त्याची परिणती प्रसवपूर्व चिंता किंवा नैराश्यात होऊ शकते.

एका अहवालानुसार, दहापैकी एक महिलेला गर्भधारणेदरम्यान नैराश्याचा अनुभव येतो. अर्थात त्यावर मात करता येते. या काळातल्या मानसिक अवस्थेविषयी बोलणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. गर्भधारणेबाबत तुम्ही ज्यांच्याकडे उपचार घेता, त्या आरोग्यतज्ज्ञांना तुमच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीबद्दल सांगा.

प्रसूतीनंतरचे मानसिक आरोग्य

तुम्हाला प्रसूतीनंतर दुखत असेल, पुरेशी झोप न मिळाली नसेल, बाळाच्या जन्मामुळे भावनिक लाटा येत असतील आणि चांगली आई होण्याबाबत काळजी वाटत असेल, तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तुम्ही ‘बेबी ब्लूज’बद्दल ऐकले असेल.

ऐंशी टक्क्यांपर्यंत स्त्रियांना बाळंतपणानंतर चिडचिड, अतिसंवेदनशील होणे, मूड बदलणे अशा मानसिक अवस्थांमधून जावे लागते. (बहुतेकदा जन्मानंतर तिसरा दिवस आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान)

बहुतेकदा, संप्रेरक पातळीतील बदल दोषी असतात आणि या भावना सहसा काही दिवसात निघून जातात. फक्त चांगले पाठबळ आणि समज या गोष्टी पुरेशा असतात. मात्र, ही लक्षणे सुरुवातीच्या दिवसांपलीकडेही राहिली, तर हे उदासीनता किंवा चिंता यासारख्या गंभीर गोष्टीचे लक्षण असू शकते.

या काळातील मानसिक आरोग्य कसे सांभाळायचे याविषयी पुढील भागात बघू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com