आईपण सांभाळताना

मदर्स डे हा मे महिन्यात साजरा केला जातो. किशोरावस्थेपासून स्त्रीच्या शरीरात विविध शारीरिक व मानसिक बदल होत असतात.
women transfer into mother Problems faced by women and its solution
women transfer into mother Problems faced by women and its solutionsakal
Summary

मदर्स डे हा मे महिन्यात साजरा केला जातो. किशोरावस्थेपासून स्त्रीच्या शरीरात विविध शारीरिक व मानसिक बदल होत असतात.

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

मदर्स डे हा मे महिन्यात साजरा केला जातो. किशोरावस्थेपासून स्त्रीच्या शरीरात विविध शारीरिक व मानसिक बदल होत असतात. घरातील सर्वांची काळजी घेणारी ‘आई’ स्वतःकडे नकळत दुर्लक्ष करते. साधारणपणे तिशी ते पन्नाशीपर्यंतच्या वयामध्ये स्त्रीयांना उद्‍भवणाऱ्या समस्या

१) वजनवाढ

२) हार्मोनल असंतुलन

३) हाडांचा ठिसूळपणा

४) मलावरोध

५) अनियमित मासिक पाळी

६) सांध्याचे विकार

७) ॲनेमिया

८) कर्करोग

९) मानसिक तणाव

१०) नैराश्य

साधारणपणे या सर्व आजारांचे मूळ कारण

  • असंतुलित आहार

  • व्यायामाचा अभाव

  • अपुरी झोप

  • अतिस्निग्ध, गोड पदार्थांचा वापर

  • चहा, कॉफी या पेयांचे अतिरिक्त सेवन

  • ताण, चिंता

म्हणून आईपण सांभाळताना काही महत्त्वाच्या गोष्टी आप‌ल्या जीवनशैलीत आणाव्यात

  • दररोज पन्नास-साठ मिनिटे व्यायाम

  • वीस मिनिटे श्वसनाचे व्यायाम व योगासने

  • दिवसभरात बारा-तेरा ग्लास पाणी प्यावे

  • आहारामध्ये चोथायुक्त, क्षार व जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा वापर

  • अतिरिक्त मीठ, साखर, मैदा यांचा वापर टाळावा

  • स्वतःच्या आरोग्याचे व व्यायामाचे लहान लहान गोल्स सेट करावेत.

  • वार्षिक आरोग्यविषयक चाचण्या व तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

  • मानसिक आरोग्यासाठी एकत्रित व्यायाम, वाचन, बागकाम, चित्रकला, नाच इत्यादीसारख्या ॲक्टिविटींमध्ये सहभाग घ्यावा.

  • किमान दिवसभरात दहा-पंधरा मिनिटे शांतपणे बसून दिवसभवचे नियोजन करावे.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम, आयर्न, जीवनसत्त्व बी व सी यांचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com