Women's Fashion : जीन्सवर प्रिंटेड शॉर्ट कुर्तीजची चलती; स्वस्तात मस्त ‘हे’ भारी पॅटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Fashion

Women's Fashion : जीन्सवर प्रिंटेड शॉर्ट कुर्तीजची चलती; स्वस्तात मस्त ‘हे’ भारी पॅटर्न

Womens Fashion : जर तुम्हाला लेटेस्ट स्टाइल आणि पॅटर्नची शॉर्ट कुर्ती हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी अनेक पर्याय घेऊन आलो आहोत. हे सर्व कुर्ते शॉर्ट असून त्यावर प्रिंट डिझाईन्स केले आहेत. कॅज्युअल, रेग्युलर आणि ऑफिस वेअरसाठीही ही कुर्ती उत्तम आहे. तुम्ही या प्रिंटेड शॉर्ट कुर्ती (Printed Short Kurti) जीन्स किंवा ट्राउझर्ससोबत घालू शकता.

हेही वाचा: Lifestyle Tips: घरच्या घरी बनवा नीम साबण

हे कुर्ते सॉफ्ट आणि स्मुद फॅब्रिकपासून बनवले आहेत. ते परिधान केल्याने तुम्हाला स्टायलिश लुक (Stylish look) तसेच आकर्षक स्टाइल (Attractive Style) मिळू शकते. यांची किंमत १००० पेक्षाही कमी आहे.

हेही वाचा: Fashion Tips : स्ट्रेचेबल फॅब्रिकच्या 'या' लेटेस्ट जीन्स पहा, स्टायलिश लूक मिळवा..

कलर पेटल फ्लोरल प्रिंट

कलर पेटल फ्लोरल प्रिंट कुर्तीज शॉर्ट असून यामध्ये इंडिगो आणि ब्रिलियंट कलर कलेक्शन दिले गेले आहे. सॉफ्ट फॅब्रिकपासून बनवण्यात आलेल्या या कुर्तीत तुम्ही कॅज्युअल लुक मिळवू शकता. ही कुर्ती डेली (Daily Use) वापरासाठीही उत्तम ठरू शकते. सर्व साईझ ही कुर्ती उपलब्ध आहे.

हेही वाचा: Fashion Tips: पाकीट अशक्त असतानाही दिसा Stylish; 'या' टीप्स लक्षात ठेवा!

यल्लो प्रिंटेड पॅटर्न कुर्ती

पिवळ्या रंगाची कुर्ती खूप खुलून दिसते. या कुर्तीमध्ये तुम्हाला आकर्षक प्रिंटेड पॅटर्न दिला जात आहे. ही कुर्ती शर्ट सारखी असून कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी चांगली आहे. ही राउंड नेक (Round Neck) कुर्ती सॉफ्ट रेयॉन फॅब्रिकने बनलेली आहे.

हेही वाचा: Fashion Tips : लेहंग्यावर ओढणी घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ग्रीन डिझाईन प्रिंट कुर्ती

या शॉर्ट कुर्तीमध्ये स्ट्रेट स्टाइल (Strate Style) दिली जात आहे. या पांढऱ्या रंगाच्या कुर्तीवर हिरव्या रंगात प्रिंटचे डिझाईन करण्यात आले आहे. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांच्याही पसंतीस हा पॅटर्न पडला आहे. ही कुर्ती आरामदायक कॉटनपासून बनलेली आहे.

हेही वाचा: Video :विकी-कतरिनाचा Fashionable एअरपोर्ट लूक

फ्लॉवर प्रिंट कुर्ती

फॅशनेबल आणि लेटेस्ट स्टाइलची ही कुर्ती छानच आहे. या कुर्तीमध्ये फ्लॉवर प्रिंट पॅटर्न दिला आहे. यामध्ये रेग्युलर फिटिंग एअर जयपुरी प्रिंट पॅटर्न अतिशय आकर्षक आहे. कॅज्युअल वेअर ही कुर्ती बेस्ट मानली जाते. जीन्ससोबतही ही कुर्ती तूम्हाला एकदम परफेक्ट लुक देईल.

Web Title: Womens Fashion These Are Best Print Design Short Kurti For Women Under 1000

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fashionclothes