Women’s Fashion : जूने ब्लाउज फेकून देऊ नका, ही ट्रिक वापरा ब्लाउज पुन्हा परफेक्ट बसतील

लग्नात शिवलेले हेवी वर्क असलेले ब्लाऊजही लहान बहिणीला द्यावे लागते
Women’s Fashion
Women’s Fashionesakal

Women’s Fashion :

आजकाल लोकांची लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की सहा महिन्यात त्यांच वजन, रंग यात फरक होतो. लग्नानंतर तर हमखास मुलींचे वजन वाढते. त्यामुळे अनेक कपडे मनात इच्छा नसतानाही फेकून द्याव्या लागतात.

विशेषत: लग्नानंतर मुलींच्या वजनात फरक पडतो. त्यामुळे लग्नात शिवलेले हेवी वर्क असलेले ब्लाऊजही लहान बहिणीला द्यावे लागतात. पण मग लग्नातल्या साडीवर घालायचे काय असा प्रश्न पडतो. अन् साडीवर मॅचिंग ब्लाऊज नसेल तर मात्र ते विचित्र दिसू लागतं.

Women’s Fashion
Perl Blouse Trend : दीपिका, काजोलनेही ट्राय केलेली पर्ल ब्लाऊजची डिझाईन एकदा पहाच!

हेवी वर्क असलेल्या साड्या, शालू यांच्यावर पुन्हा नवे ब्लाऊज घेऊन शिवणं तसं परवडणारंही नसतं. त्यामुळेच जून्या ब्लाऊजला सध्याच्या परफेक्ट साईजनुसार कसं बदलायचं हे पाहुयात.

जून्या ब्लाऊजला नवा लुक देण्यासाठी आपल्याला तुमची साडी लागेल. ज्या ब्लाऊजची साईज मोठी करायची असेल ती साडी घेऊन तिच्या पहिल्या टोकाकडून अंदाज घेऊन एक पट्टी कापून घ्या. ज्यात साडीचे काठ यायला हवेत. किंवा पदराकडील बाजूनेही तुम्ही ही पट्टी घेऊ शकता.

आता ब्लाउज घेऊन ते मागील गळ्यापासून मधोमध कापून घ्या. आता मागील बाजूस मॅचिंग होईल असे काठ किंवा साडीतील कापडाने ब्लाऊज जोडून घ्या.

Women’s Fashion
Blouse Design : मुलींनो तुमच्यासाठी सोनम कपूरच्या युनिक ब्लाउजचं कलेक्शन

म्हणजे मागील गळ्याची जी पट्टी कापली आहे तिथे एक नवा पॅच जोडून घ्या. तुम्ही क्रॉस मॅचिंग पट्टीही तिथे लावू शकता. त्यावर तुम्ही एब्रॉयडरी वर्कही करू शकता. जेणेकरून ती डिझाईन वेगळी पण आकर्षक दिसेल.  

आता गळा मोठा झाल्याने मागील बाजूने ब्लाऊज घसरतोय असे वाटू शकते. त्यामुळे, ब्लाऊजला मॅच होतील अशा लेस, नॉट तुम्ही लावू शकता.

जर मुळातच तुमच्या साडीवरील ब्लाऊज क्रॉस मॅचिंग असेल. तर, साडीतील पट्टी न कापता तुम्ही बाजारातून तशाच कापडाचे, वर्क असलेले कापड घेऊन येऊ शकता. जे ब्लाउजला परफेक्ट लुक देईल.

Women’s Fashion
Blouse Fashion: काळ्या साडीसोबत या कलरचे ब्लाऊज ट्राय करून पाहा, दिसाल एकदम हिरॉइनसारख्या

तुम्ही हे ही करू शकता

तुम्हाला साडी कापायची नसेल तर ब्लाउज जोडण्यासाठी तुम्ही नेट, मोठी जाड लेस, वर्क केलेले पॅचही वापरू शकता. जे तुमच्या ब्लाउजला इतरांपेक्षा वेगळे बनवतील.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com