Woolen Kurti Sale : 500 ला 3 वुलन कूर्तीचा सेल लागलाय, पण कूठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woolen kurtis

Woolen Kurti Sale : 500 ला 3 वुलन कूर्तीचा सेल लागलाय, पण कूठे?

हिवाळा सुरू झाला असून आता पहाटेच नाही तर दिवसभरही हवेत गारवा जाणवू लागला आहे. थंडीचा ऋतू आला की सगळ्यांचा ड्रेसकोडच वेगळा असतो. कोणताही ड्रेस घाला त्यावर स्वेटर घालावेच लागते. काहींना ते खूप विचित्र वाटते त्यामूळे तरूणी स्वेटर घालणे टाळतात आणि थंडीत कुडकूडत बसतात. new delhi ncr top cheapest woolen kurti sale

या समस्येवर बाजारात काही स्टायलिश स्वेटरही आली आहेत. पण, तरीही स्वेटर नकोच म्हणणारा एक गृप आहेच. अशा तरूणींसाठी खास वूलन कूर्तीज बाजारात आल्या आहेत. हा नवा ट्रेंड असल्याने त्याच्या किंमतीही अवाढव्य आहेत. जर तुम्हाला स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ कुर्ती हव्या असतील तर तूमच्यासाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरेल़.

एका मार्केटमध्ये सेल लागला आहे. या सेलमध्ये तुम्हाला एक वूलन कूर्ती 200 रुपयांना मिळेल. तर तीन कूर्ती तुम्हाला 500 रुपयांमध्ये मिळतील. किंमत इतकी कमी असली तरी त्यांची क्वालिटी एकदम कडक आहे. केवळ रंगच नाही तर त्याच्या डिझाईनमध्येही व्हरायटी आहे.

हा सेल दिल्लीतील एनसीआर मार्केटमध्ये सुरू आहे. इंदिरा मार्केटपासून ते सेक्टर 27 आटा बाजार आणि ग्रेनो वेस्टच्या मॉल्सच्या बाहेर अनेक ठिकाणी तुम्हाला अशा कुर्त्या मिळतील. येथे तुम्ही 200 ते 400 रुपयांमध्ये एकापेक्षा जास्त कुर्त्या आणि पायजमा खरेदी करू शकता.

हेही वाचा: Sonakshi sinha nude makeup : न्यूड मेकअपने लुक अजून क्लासी बनवा; सोनाक्षी देतेय टीप्स!

दिल्लीच्या गांधी नगरमध्ये 15 हजारांहून अधिक दुकाने आहेत आणि ते आशियातील सर्वात मोठे मार्केट आहे. येथे तुम्हाला 100 ते 200-300 रुपयांमध्ये चांगला स्वेटर किंवा उबदार कूर्ती मिळतील. एवढेच नाही तर दिल्लीच्या चांदनी चौक, जनपद, लाजपत नगर, सरोजिनी नगर, करोल बाग आणि शहादरा मार्केटमध्येही तुम्ही याच किंमतीत वूलन कूर्तीज खरेदी करू शकता.

गाझियाबाद तुराब नगर मार्केट, घंटाघर मार्केट, गांधीनगर मार्केट, सदर बाजार येथे तुम्हाला वूलन कूर्ती आणि सूट, स्वेटर अतिशय कमी किमतीत मिळतील. कधी कधी बार्गेनिंग करून तूम्ही कमी किंमतीत जास्त खरेदी करू शकता.