
थोडक्यात:
ऑफिस आणि प्रवासानंतर थकलेल्या शरीराला आराम देण्यासाठी हलकं चालणं उपयुक्त ठरू शकतं.
फक्त १० मिनिटं संध्याकाळी चालल्याने शरीर-मन ताजेतवाने होतं आणि आरोग्य सुधारतं.
अवघड व्यायामाऐवजी घराजवळ किंवा ऑफिसच्या परिसरात साधं चालणंही पुरेसं असतं.
Evening Walk Amazing Health Benefits: दिवसभर ऑफिसमध्ये 8-10 तास काम करुन त्यानंतर काही तासाचा प्रवास करुन आपण जेव्हा घरी येतो तेव्हा कधी एकदा बेडवर आडवे पडतोय असे आपल्याला वाटते. काहींना तर फक्त सोफ्यावर जाऊन बसायचं, मोबाईलवर टाइमपास करायचा किंवा कुठलीतरी मालिका बघायची इच्छा होते. पण या सवयी आरोग्यासाठी फारशा चांगल्या नसतात.
याच्या ऐवजी जर आपण रोज संध्याकाळी ऑफिसनंतर फक्त 10 मिनिटे शांतपणे चालायचे ठरवले, तर शरीर आणि मनासाठी खूप फायदे होऊ शकतात. कोणताही अवघड व्यायाम करण्याऐवजी, फक्त घराजवळ, ऑफिसच्या आवारात किंवा बिल्डिंगच्या गच्चीवर साधे चालणे पुरेसे ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कामानंतर फक्त 10 मिनिटे चालण्याचे फायदे.